एका प्रतिष्ठित कुटुंबातील जोडप्याचा २५वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने एक पार्टी आयोजित करण्यात आली. सानंद परिसरातील निर्वाणा ग्रीन्स वीकेंड होम्स येथे ही अलिशान लोकांची पार्टी सुरू होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पार्टीच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा दृश्य बघून पोलिसही अवाक् झाले. गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल लोकांच्या पार्टीत ८१ लोकांना ताब्यात घेण्यात आले. यात ४३ पुरुष आणि ३८ महिला सहभागी झाल्या होत्या.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये शहरातील नामवंत बिल्डर, डॉक्टर आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे शहरासह राज्यात खळबळ उडाली आहे.
धाड पडतात सुरू झाली धावपळ
गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सानंद पोलिसांनी वीकेंड होमवर धाड टाकली. आत प्रवेश करताच महिला आणि पुरूष नशेत होते. ११ टेबल्सवर जेवण आणि परदेशी दारू होती. त्याचबरोबर हुक्काही होता. पार्टीला उपस्थित असणारे ३५ ते ४५ या वयोगटातील होते. पोलीस तिथे आल्याचे कळतात सगळेच घाबरले आणि धावपळ सुरू झाली.
पोलिसांनी असंख्य दारुच्या बाटल्या, हुक्का पाईप्स, त्याचबरोबर २० पेक्षा जास्त लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी सांगितलं की, ताब्यात घेण्यात आलेल्या ४३ पुरुष आणि ३८ महिलांचा समावेश आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. महिलांना कायदेशीर नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
Web Summary : Police raided a high-profile anniversary party in Ahmedabad, arresting 81 people, including businessmen and doctors. The party featured alcohol and hookahs. Luxury cars were seized, and women were released after a notice.
Web Summary : अहमदाबाद में एक हाई-प्रोफाइल वर्षगांठ पार्टी पर पुलिस ने छापा मारा, जिसमें व्यवसायी और डॉक्टर सहित 81 लोगों को गिरफ्तार किया गया। पार्टी में शराब और हुक्का था। लग्जरी गाड़ियां जब्त की गईं, और महिलाओं को नोटिस के बाद रिहा कर दिया गया।