शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

Spicejet च्या वैमानिकांना क्रोएशियामध्ये विमानातच घालवावे लागले 21 तास, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 5:42 PM

Spicejet : या वैमानिकांमध्ये दोन कमांडर आणि दोन फर्स्ट ऑफिसर यांचा समावेश आहे. मंगळवारी जागरेब येथे जवळपास 21 तास बोईंग 737 विमानात घालवल्यानंतर हे वैमानिक दिल्लीला परतले.

ठळक मुद्देपरतलेल्या विमानात कोणतेही प्रवासी किंवा सामान नव्हते. नागरी उड्डयन संचालनालयाने (DGCA)स्पाइसजेटला या घटनेबद्दल फटकारले आहे.

नवी दिल्ली : स्पाइसजेट (Spicejet) या खासगी विमान कंपनीच्या चार वैमानिकांना क्रोएशियन राजधानी जागरेबमध्ये संपूर्ण दिवस विमानातच घालावा लागला. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे कोरोनाचा आरटी-पीसीआर (RT-PCR) रिपोर्ट नव्हता. स्पाइसजेटने अनिवार्य असलेली त्यांची प्री-फ्लाइट आरटी-पीसीआर टेस्ट केली नव्हती. कोरोनाच्या निगेटिव्ह रिपोर्टशिवाय ते क्रोएशियाला पोहोचले, त्यामुळे तेथे त्यांना विमानातून उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. यामुळे वैमानिकांना विमानातच सुमारे 21 तास घालवावे लागले. (No Rt-Pcr Report: 4 Spicejet Pilots Spend Almost A Day Inside Aircraft In Croatia Before Flying Back To Delhi)

या वैमानिकांमध्ये दोन कमांडर आणि दोन फर्स्ट ऑफिसर यांचा समावेश आहे. मंगळवारी जागरेब येथे जवळपास 21 तास बोईंग 737 विमानात घालवल्यानंतर हे वैमानिक दिल्लीला परतले. परतलेल्या विमानात कोणतेही प्रवासी किंवा सामान नव्हते. नागरी उड्डयन संचालनालयाने (DGCA)स्पाइसजेटला या घटनेबद्दल फटकारले आहे.

दिल्लीहून उड्डाण करण्यापूर्वी क्रोएशियाच्या अधिकाऱ्यांकडून ईमेल आला होता की, आरटी-पीसीआर वैमानिकांसाठी आवश्यक नाही. विमानाने जागरेब पोहोचल्यानंतर कर्माचाऱ्यांना सांगितले की, निर्देश बदलले आहेत. भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता सर्वांना आरटी-पीसीआर टेस्ट आवश्यक करण्यात आली आहे. आमच्यासाठीसुद्धा हे आश्चर्यकारक होते, असे स्पाइसजेटच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

(डॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू)

फ्लाइट ड्युटी वेळेवर बंधने आल्याने वैमानिक ताबडतोब परत येऊ शकले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना विमानातील सर्व सुविधा पुरविल्या गेल्या आणि विमानाची साफ-सफाई केली. डीजीसीएकडून परवानगी घेण्यात आली. वैमानिकांनी विमानात 21 तास विश्रांती घेतली आणि त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले. सर्व वैमानिकांचे म्हणणे आहे की, विमानात केलेल्या व्यवस्थेमुळे ते आनंदी होते. दरम्यान, 11 मे रोजी स्पाइसजेटने दिल्ली-तिबलिसी-जागरेबवर उड्डाण क्रमांक एसजी-9035 चालविले आणि त्यात 4 वैमानिक होते.

प्रवाशांविना उड्डाणआरटी-पीसीआर रिपोर्ट नसल्यामुळे क्रोएशियाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विमानातून खाली उतरू दिले नाही. नियमानुसार वैमानिकांसाठी दोन उड्डाणादरम्यान 21 तास विश्रांती घेणे आवश्यक आहे. परंतु या घटनेमुळे वैमानिकांसाठी परिस्थिती सोयीची नव्हती. त्यामुळे स्पाइसजेटने जागरेब ते दिल्ली उड्डाण करण्यासाठी डीजीसीएकडून मान्यता मिळविली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, डीजीसीएने स्पाइसजेटला प्रवाशांविना उड्डाण करण्यास सांगितले होते.

टॅग्स :spicejetस्पाइस जेटcorona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानAirportविमानतळ