४ दिवसांचे अधिवेशन अन् ३ दिवसांचे केले निलंबन; आम आदमी पक्षाच्या ४ आमदारांना केले निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:46 IST2026-01-06T10:45:40+5:302026-01-06T10:46:59+5:30
हे अधिवेशन अवघे चारच दिवस चालणार आहे.

४ दिवसांचे अधिवेशन अन् ३ दिवसांचे केले निलंबन; आम आदमी पक्षाच्या ४ आमदारांना केले निलंबित
चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आम आदमी पक्षाच्या चार आमदारांना निलंबित करण्यात आले. यात संजीव झा, कुलदीप कुमार, सोमदत्त आणि जर्नेल सिंग यांचा समावेश असून, त्यांना तीन दिवस सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही.
उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांचे अभिभाषण सुरू असतानाच आम आदमी पक्षाच्या आमदारांनी दिल्लीच्या हवेत वाढलेल्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. हे अधिवेशन अवघे चारच दिवस चालणार आहे.
सभागृहात जबाबदारीने वागायला हवे : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सभागृहात जबाबदारीने वागायला पाहिजे. विधानसभेचे हे अधिवेशन लोकाभिमुख धोरण आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. यामुळे येथे प्रदूषणासारख्या मुद्यांवर चर्चा व्हायला पाहिजे. सर्व आमदारांनी चर्चेत भाग घ्यावा. हे अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे.