प. बंगालमध्येही मिशन गुवाहाटी?, तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 09:30 IST2022-07-28T09:29:22+5:302022-07-28T09:30:05+5:30
गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

प. बंगालमध्येही मिशन गुवाहाटी?, तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा
कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे नेते व अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी केला . त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये राजकीय उलथापालथ होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते म्हणाले की, २१ आमदार माझ्या थेट संपर्कात आहेत. मात्र खोटा दावा करून भाजप नेते मिथुन चक्रवर्ती लोकांची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका तृणमूल काँग्रेसने केली आहे.