"भीतीच्या वातावरणामुळे देश सोडून गेले 35000 उद्योगपती", पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 06:00 PM2021-10-22T18:00:59+5:302021-10-22T18:01:53+5:30

Entrepreneurs left India: पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांनी ट्विट केले की, हे सर्व फरार होणारे सर्व उद्योगपती हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल (HNI) म्हणजेच श्रीमंत लोक आहेत आणि ते आता अनिवासी भारतीय झाले आहेत.

35,000 high net worth Indian entrepreneurs left India under Modi govt: Amit Mitra | "भीतीच्या वातावरणामुळे देश सोडून गेले 35000 उद्योगपती", पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

"भीतीच्या वातावरणामुळे देश सोडून गेले 35000 उद्योगपती", पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

googlenewsNext

पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या सहा वर्षांत म्हणजेच 2014 ते 2020 मध्ये जवळपास 35,000 उद्योगपतींनी देश सोडला असल्याचे अमित मित्रा यांनी म्हटले आहे. तसेच, उद्योगपती भीतीच्या वातावरणामुळे देश सोडून जात आहेत, असे वाटत आहे. या प्रकरणावर संसदेत श्वेतपत्र जारी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणीही अमित मित्रा यांनी केली आहे. ( 35,000 high net worth entrepreneurs left India during Narendra Modi regime: Amit Mitra)

याचबरोबर, पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांनी ट्विट केले की, हे सर्व फरार होणारे सर्व उद्योगपती हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल (HNI) म्हणजेच श्रीमंत लोक आहेत आणि ते आता अनिवासी भारतीय झाले आहेत. अमित मित्रा यांनी गुरुवारी एकापाठोपाठ अनेक ट्वीट केले. ते म्हणाले, 'भारत जगात स्थलांतराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे ... शेवटी का? 'भीतीचे वातावरण'? पंतप्रधानांनी आपल्या सरकारमध्ये उद्योजकांच्या या मोठ्या स्थलांतरावर संसदेत श्वेतपत्रिका जारी करावी.

याशिवाय, अमित मित्रा म्हणाले की, मॉर्गन स्टॅन्लीच्या (organ Stanley) रिपोर्टनुसार, जवळपास 23,000 हाय नेटवर्थ उद्योजकांनी 2014 ते 2018 दरम्यान भारत सोडला. ही जगातील सर्वात वाईट परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे, ग्लोबल वेल्थ मायग्रेशन (Global Wealth Migration) रिपोर्टनुसार, 2019 मध्ये 7,000 आणि 2020 मध्ये 5,000 व्यवसायिकांनी भारत सोडला आहे.

अमित मित्रा यांनी या प्रकरणी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "पीयूष गोयल यांचे 19 मिनिटांचे भाषण लक्षात ठेवा, ज्यात ते भारतीय व्यापारी क्षेत्रातील प्रथेला देशाच्या हिताच्या विरोधात सांगत आहेत. म्हणजेच ते एक प्रकारे त्यांना देशद्रोही म्हणत आहेत. अशा भीतीच्या वातावरणातूनच स्थलांतर वाढते. असे असूनही, पंतप्रधानांनी पीयूष गोयल यांना फटकारले नाही.  अखेर का?"  दरम्यान, अमित मित्रा प्रत्यक्षात पीयूष गोयल यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत होते, जे त्यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये सीआयआय कार्यक्रमात केले होते.

Web Title: 35,000 high net worth Indian entrepreneurs left India under Modi govt: Amit Mitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.