हदगाव येथील गदारोळप्रकरणी ३५ जण ताब्यात
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:24+5:302015-02-18T00:13:24+5:30
हदगाव : शहरात १३ फेब्रुवारी रोजी व्हाटस्ॲपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी हदगाव पोलिसांनी आजपर्यंत ३५ जणांना ताब्यात घेतले़

हदगाव येथील गदारोळप्रकरणी ३५ जण ताब्यात
ह गाव : शहरात १३ फेब्रुवारी रोजी व्हाटस्ॲपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी हदगाव पोलिसांनी आजपर्यंत ३५ जणांना ताब्यात घेतले़मंगळवारी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा़ ॲड़राजीव सातव यांनी हदगावला भेट दिली़ यावेळी काँग्रेसचे तालुका प्रभारी अनिल पाटील बाभळीकर, नगराध्यक्ष अमित अडसूळ, माजी नगरसेवक सुनील सोनुले, उपाध्यक्ष अहमद पटेल, नगरसेवक बाबुअण्णा पिचकेवार, आनंद कांबळे यांनी सदरील घटनेबाबत खा़ सातव यांना माहिती दिली़ खा़सातव यांनी पोलिस ठाण्यास भेट देवून सहायक पोलिस निरीक्षक एस़टी़ निकम यांना या प्रकरणात दोषींवर कार्यवाही करा पण निष्पाप यात गोवले जावू नये याची खबरदारी घ्यावी असे सांगितले़