शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

छत्तीसगडमध्ये चकमकीत ३१ नक्षलींचा खात्मा; २ महिन्यांत ८१ नक्षलींना पाठवले यमसदनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 05:20 IST

मृतांत ११ महिलांचा समावेश, दाेन सुरक्षा कर्मचारी शहीद

बिजापूर (छत्तीसगड) : नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोठ्या कारवाईत सुरक्षा दलांनी घनघोर चकमकीमध्ये ३१ नक्षलींचा खात्मा केला. मृतांत ११ महिलांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात रविवारी या चकमकीच्या वेळी दोन सुरक्षा कर्मचारी शहीद झाले व दोन जण जखमी झाले.

या चकमकीबरोबरच छत्तीसगडमध्ये यावर्षी आतापर्यंत यमसदनी पाठवण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या ८१ वर गेली आहे. मृत सर्व नक्षलवादी गणवेशधारी होते व घटनास्थळाहून स्वयंचलित शस्त्रे सापडली आहेत. इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात सकाळी विविध सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली होती, असे बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. 

जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी), विशेष कृती दल (एसटीएफ) व बस्तर फायटर्स या राज्य सरकारच्या दलांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ही मोहीम ७ फेब्रुवारीपासून हाती घेण्यात आली होती. चकमकीच्या ठिकाणी आतापर्यंत ३१ नक्षलवाद्यांचे त्यांच्या गणवेशातील मृतदेह हाती लागले आहेत. त्याचबरोबर एके-४७, इन्सास, एसएलआर, पॉइंट ३०३ रायफल्स ही शस्त्रास्त्रे व बॅरल ग्रेनेड लाँचर्स आणि स्फोटकांचा मोठा साठाही सापडला आहे. चकमकीत डीआरजीचे हेड कॉन्स्टेबल नरेश ध्रुव व एसटीएफचे कॉन्स्टेबल वासित रावते शहीद झाले. डीआरजीचे जग्गू कलमू व एसटीएफचे गुलाब मांडवी चकमकीत जखमी झाले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांना रायपूरमध्ये हलवण्यात आले आहे. 

नक्षलवाद मार्च २०२६ पर्यंत नष्ट करू : अमित शाह३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद नष्ट करू. देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे जीव गमवावा लागणार नाही, असा आशावाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी एक्सवर व्यक्त केला. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सुरक्षा दलाने विजापूरमध्ये मोठे यश मिळविले आहे. आज आम्ही दोन शूर जवान गमविले आहेत. हा देश या जवानांचा नेहमीच ऋणी राहील.

६५० जवानांनी केली कारवाई

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की, तब्बल ६५० सुरक्षा कर्मचाऱ्यांनी इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात विविध बाजूंनी प्रवेश केला आणि ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. 

अधिक कुमक बोलावली : रविवारी सकाळी ८ वाजता पर्वतीय भागात सुरू झालेली चकमक दुपारी ४ पर्यंत चालली. चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलांची अधिक कुमक बोलावण्यात आली असून, संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. 

जानेवारी महिन्यात झालेल्या चकमकी

४ जानेवारी : अबुझमदच्या जंगलात चकमक, एका महिलेसह ५ नक्षलवादी ठार, एक डीआरजी जवान शहीद.६ जानेवारी : सैनिकांच्या वाहनाला आयईडी स्फोटाने उडव. ८ सैनिक शहीद, एक चालकही ठार.९ जानेवारी : सुकमा-विजापूर सीमेवर ३ नक्षलवादी ठार.१२ जानेवारी : विजापूरच्या माडेड भागात चकमक, २ महिला नक्षलवाद्यांसह ५ नक्षलवादी ठार.१६ जानेवारी : छत्तीसगड-तेलंगण सीमेवरील कांकेर पुजारी गावात १८ नक्षलवादी ठार.२०-२१ जानेवारी : गरियाबंद जिल्ह्यात चकमक, १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीAmit Shahअमित शाह