३०० जागा जिंकणार अन् मोदी पुन्हा पंतप्रधान! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 11:59 IST2023-04-12T11:58:47+5:302023-04-12T11:59:12+5:30

भाजप पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात लोकसभेच्या ३०० हून अधिक जागा जिंकेल

300 seats will be won and Modi will be Prime Minister again Union Home Minister Amit Shah claim | ३०० जागा जिंकणार अन् मोदी पुन्हा पंतप्रधान! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

३०० जागा जिंकणार अन् मोदी पुन्हा पंतप्रधान! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

दिब्रुगड (आसाम) :

भाजप पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात लोकसभेच्या ३०० हून अधिक जागा जिंकेल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी येथे केला. 

येथे सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकण्यासह मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.

काँग्रेसवर हल्ला करताना शाह म्हणाले, ‘ईशान्य हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता; परंतु राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतरही प्रदेशातील तीन राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही.’

...तर काँग्रेस संपूर्ण देशातून नष्ट होईल
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या दौऱ्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संदर्भ देत शाह म्हणाले, ‘त्यांनी (राहुल) परदेशी भूमीतून भारताचा अपमान केला. त्यांनी असेच सुरू ठेवले तर काँग्रेस केवळ ईशान्येतूनच नाही, तर संपूर्ण देशातून नष्ट होईल. ते म्हणाले, ‘ते पंतप्रधानांची जेवढी निंदा करतील, तेवढा भाजप पुढे जाईल,’ असे ते म्हणाले.

Web Title: 300 seats will be won and Modi will be Prime Minister again Union Home Minister Amit Shah claim