ज्योतिरादित्य शिंदे: ३० वर्षांपूर्वी वडिलांकडे होती नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी; आता मुलाकडेही तेच खातं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 03:01 PM2021-07-08T15:01:38+5:302021-07-08T15:02:15+5:30

ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशात भाजापाचं सराकर आणण्यासाठी दिलेल्या योगदानंचं बक्षिस म्हणून मोदी सरकारनं त्यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं.

30 years ago father madhaorao scindia was civil aviation minister now son jyotiraditya is handling this ministry | ज्योतिरादित्य शिंदे: ३० वर्षांपूर्वी वडिलांकडे होती नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी; आता मुलाकडेही तेच खातं

ज्योतिरादित्य शिंदे: ३० वर्षांपूर्वी वडिलांकडे होती नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी; आता मुलाकडेही तेच खातं

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचं नाव आघाडीवर होतं. ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशात भाजापाचं सराकर आणण्यासाठी दिलेल्या योगदानंचं बक्षिस म्हणून मोदी सरकारनं त्यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं.

मार्च २०२० मध्ये आपल्या समर्थक आमदारांसह ज्योतिरादित्य शिंदे भाजापमध्ये दाखल झाले. त्यांच्यामुळेच मध्य प्रदेशात भाजपचं सरकार बनू शकलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या खांद्यावर नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महत्वाची बाब अशी की ३० वर्षांपूर्वी त्यांचे वडील माधवराव शिंदे यांच्याकडेही याच मंत्रालयाची म्हणजेच नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. (30 years ago father madhaorao scindia was civil aviation minister now son jyotiraditya is handling this ministry)

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? जाणून घ्या एका क्लिकवर...

माधवराव शिंदे हे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात नागरी उड्डाण मंत्री म्हणून कार्यरत होते. १९९१ ते १९९३ या काळात माधवराव यांनी नागरी उड्डाण मंत्री आणि पर्यटन मंत्रालयाच्या मंत्रिपदाचं काम पाहिलं होतं. याच काळात देश राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाच्या महत्वाच्या टप्प्यावर होता. भारतानं त्यावेळी जागतिकीकरणाचा स्वीकार केला होता. त्यामुळे अतिशय आव्हानात्मक काळात माधवराव यांनी देशाच्या उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. आता ज्योतिरादित्य शिंदे देश कोरोना महामारीच्या आव्हानाला सामोरं जात असताना नागरी उड्डाणमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांची नियुक्ती अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. 

ज्योतिरादित्य आणि माधवराव दोघांनीही नागरी उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळण्याआधी केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. माधवराव यांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये संचार आणि आयटी मंत्रिपदाचं कामकाज पाहिलं आहे. देशातील पोस्ट व्यवस्थेला पुनरुज्जीवीत करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. 

२००२ साली ज्योतिरादित्य शिंदे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. वडील माधवराव यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. १८ सप्टेंबर २००१ साली माधवराव यांचा एका हवाई प्रवासातील दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यावेळी माधवराव गुना मतदारसंघाचे खासदार होते. ज्योतिरादित्य शिंदे याच मतदार संघातून २००२ साली पहिली निवडणूक लढले आणि तब्बल साडेचार लाखांहून अधिक मतांनी विजय प्राप्त करुन संसदेत पोहोचले होते. 

Web Title: 30 years ago father madhaorao scindia was civil aviation minister now son jyotiraditya is handling this ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.