शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

३०... सारांश

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

निकृष्ट दर्जाच्या मुरमाचा वापर

निकृष्ट दर्जाच्या मुरमाचा वापर
मेंढला : मेंढला - वाढोणा मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी रोडच्या कडेला मुरमाचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. तो मुरूम निकृष्ट असल्याचा आरोप सरपंच दयाराम सातपुते यांनी केला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये मुरमासह गिट्टीचा वापर करण्याची मागणीही केली आहे.
***
खंडाळा येथे हरिनाम सप्ताह
पारशिवनी : तालुक्यातील खंडाळा येथील हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहाचे गुरुवारपासून आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कलशस्थापना, विष्णू सहस्त्रनामपाठ, भजन, प्रवचन, हरी कीर्तन यासह अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सदर कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***
संत जगनाडे महाराज पुण्यतिथी
नागपूर : कन्हान येथील श्रीसंत जगनाडे महाराज स्मृती सभागृहात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त कलश पूजन, आरती, भजन, प्रवचन यासह अन्य कार्यक्रम पार पडले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. या दोन दिवसीय कार्यक्रमाला शेकडो समाजबांधवांनी हजेरी लावली होती.
***
तारसा येथे जनता दरबार
तारसा : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आ. डी. एम. रेड्डी यांच्या जनता दरबाराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या. त्या समस्या सात दिवसांत सोडविण्याचे निर्देश आ. रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
***
पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
सावनेर : तालुक्यातील बहुतांश पांदण रस्ते खराब झाले आहे. त्यावरून साधे चालणे अवघड झाले असून, शेतीमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तालुक्यातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***
बुटीबोरी येथे श्रीमद् भागवत सप्ताह
नागपूर : बुटीबोरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शनिवारपासून श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्रींची पालखी यात्रा, भजन, प्रवचन, हरिपाठ यासह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होईल. सदर कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***