शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

चमत्कार! दोन टन वजनाच्या गाडीखाली आला चिमुकला; महिलेने खेचून काढलं बाहेर, CCTV व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:34 IST

गुजरातमध्ये एक चिमुकला गाडीखाली आल्यानंतर चमत्कारिकरित्या बचावला आहे.

Gujarat Accident:गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. दारासमोर खेळत असताना एक ३ वर्षाच्या मुलगा २ हजार किलो वजनाच्या एसयूव्ही गाडी खाली आला. मात्र चमत्कारिकरित्या तो चिमुकला मुलगा सुखरूप बचावला. मुलाच्या कुटुंबियांसमोरच ही घटना घडली. मुलगा गाडीखाली येताच कुटुंबियांनी आक्रोश केला. मात्र मुलगा गाडीखालून सुखरूप बाहेर आल्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत आहे.

गुजरातमध्ये एका चमत्कारापेक्षाही मोठी घटना घडली ज्यात एका ३ वर्षाच्या मुलाला एसयूव्हीखाली आल्यानंतर वाचवण्यात यश आले. ही संपूर्ण घटना मुलाच्या घराजवळ बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्हिडीओमध्ये मुलगा घराच्या अंगणात खेळताना टोयोटा फॉर्च्युनर गाडीखाली येताना दिसत आहे.

नवसारी जिल्ह्यातील गंधवी तालुक्यात ही घटना घडली.हा मुलगा त्याच्या घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत होता. तेव्हा तिथून एक फॉर्च्युनर एसयूव्ही कार येत होती. गाडी पुढे येताच तीन वर्षांचा मुलगा त्याखाली आला. कार चालकाने सावधगिरी दाखवत तात्काळ ब्रेक लावले, ज्यामुळे मोठा अपघात टळला. मुलाच्या कुटुंबातील इतर सदस्यही धावत तिथे आले आणि त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकताच एक महिला कदाचित त्याची आई धावत आली आणि ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये ती महिला ओरडताना आणि गाडीखाली असलेल्या बाळाला शोधताना दिसत आहे. काही सेकंदांनंतर त्या महिलेने बाळाला बाहेर काढले. चमत्कारिकरित्या, या घटनेत मुलाला एकही ओरखडा आला नाही. जर त्या महिलेने वेळेवर पोहोचून गाडी थांबवली नसती तर ही घटना जीवावर बेतली असती.

दरम्यान, गेल्या वर्षी महाराष्ट्रातूनही अशीच एक घटना समोर आली होती. वसईमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाला कारने चिरडले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. कारने मुलाला धडक दिल्यानंतर त्याला फरफटत नेले होते. गाडी त्याच्या अंगावरून गेल्यानंतर, तो मुलगा वेदनेने रडत उभा राहिला होता. नंतर मुलाच्या पालकांनी ड्रायव्हरविरुद्ध तक्रार दाखल केली.

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघातcctvसीसीटीव्ही