जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 20:07 IST2018-11-13T20:05:21+5:302018-11-13T20:07:46+5:30

जम्मू-काश्मीरमधील अखनूर आणि कुपवाड्यात भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे वृत्त आहे. 

3 Terrorists Killed In Infiltration In Jammu And Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु 

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु 

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील अखनूर आणि कुपवाड्यात भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे वृत्त आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अखनूर सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. तसेच, दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त केला. दुसरीकडे, कुपवाडा जिल्ह्यातील केरनमध्ये दोन दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न होते. यावेळी त्यांचाही जवानांनी खात्मा केला.  



 

दरम्यान, या कारवाईनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.  



 

Web Title: 3 Terrorists Killed In Infiltration In Jammu And Kashmir