शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दिल्लीत 63, यूपीतील 59, तर 'या' राज्यात तब्बल 91 टक्के कोरोनाबाधित तब्‍लिगी जमातशी संबंधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 19:49 IST

अग्रवाल म्हणाले, तब्‍लिगी जमातशी संबंधित रुग्ण हे देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार टॉप 10 राज्यांमध्ये पाच राज्ये अशी आहेत, जेथे जमाती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देदेशातील 14,378 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4,291 जण निजामुद्दीन मरकजशी संबंधित असल्याचे आढळून आले आहेततब्‍लिगी जमातशी संबंधित रुग्ण हे देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेतटॉप 10 राज्यांपैकी पाच राज्यांत जमाती रुग्णांची संख्या सर्वाधिक

नवी दिल्‍ली  : देशातील कोरोनाबाधिकांची संख्या वाढतच चालली आहे. सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातून आतापर्यंत जे आकडे आले आहे. त्यापैकी अधिकांश आकडे हे दिल्‍ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तब्‍लिगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत. देशातील 14,378 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4,291 म्हणजेच 29.8 टक्के लोक हे निजामुद्दीन मरकज क्‍लस्‍टर सिंगल सोर्सशी संबंधित असल्याचे आढळून आले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्‍त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. ते कोरोनासंदर्भातील आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत बोलत होते.

 अग्रवाल म्हणाले, तब्‍लिगी जमातशी संबंधित रुग्ण हे देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार टॉप 10 राज्यांमध्ये पाच राज्ये अशी आहेत, जेथे जमाती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तामिळनाडूमध्ये 84 टक्के, दिल्ली मध्ये 63 टक्के, तेलंगाणामध्ये 79 टक्के, आंध्र प्रदेशाते 61 टक्के तर उत्तर प्रदेशात 59 टक्के कोरोनाबाधीत हे तब्लिगी जमातशी संबंधित आहेत अथवा जमातींच्या संपर्कात आले आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.3 टक्के आहे. जे इतर अनेक देशांच्या तुलने फार कमी आहे.

अरुणाचलचेही नाव जोडले गेले - एका राज्यात तर एकट्या तब्‍लिगी जमातशी संबंधितच तब्बल 91 टक्के रुग्ण आढळून आले आहेत. आसाममध्ये 35 पैकी 32 जण म्हणजे 91 टक्के लोक, अंडमानमध्ये 12 पैकी 10 म्हणजे 81 टक्के लोक जमातशी संबंधित आहेत. अरुणाचल प्रदेशात एक कोरोनाबाधित आढळून आला आहे. तोही तब्लिगी जमातशी संबंधित आहे. या एका रुग्णामुळे कोरोना प्रभावित राज्यांच्या यादीत अरुणाचलचा समावेश झाला आहे. 

जमातींमुळे या देशांतही अवघड स्थिती -तब्‍लिगी जमातच्या सदस्यांनी केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांतही चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. हे लोक पाकिस्तान, मलेशिया आणि ब्रुनेईमध्येही गेले. पाकिस्तानातील सिंध प्रांतात तब्लिगी जमातच्या 429 जणांना करोनाची लागण झाली आहे. या लोकांनी पंजाब प्रांतातील रावळपिंडी येथे एका वार्षिक धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला होता. तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात तब्लिगी जमातच्या संक्रमित सदस्यांची संख्या 1,100 एवढी आहे.

मृतांमध्ये 83 टक्के लोक वृद्ध अथवा आजारी - कोरोनामुळे होणाऱ्या मृतांमध्ये अद्याप 83 टक्के वृद्ध अथवा आजारी व्यक्तींचा समावेश आहे. देशातील 45 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य विभाग प्रशासनासोबत आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. मात्र, ज्या 23 राज्यांतील 47 जिल्ह्यांत सर्वप्रथम संक्रमित आढळून आले होते, तेथे गेल्या 28 दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, असेही केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीAssamआसामUttar Pradeshउत्तर प्रदेशTelanganaतेलंगणाTamilnaduतामिळनाडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशMuslimमुस्लीमIslamइस्लाम