शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

२९... गुन्हे... जोड... ०१

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
नागपूर : विजेचा जोरदार धक्का लागल्याने तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या करंजोली शिवारात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
महेश महादेव नानवटकर (३२, रा. करंजोली, ता. नरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. महेश हा त्याच्या करंजोली शिवारातील शेतात ओलित करत होता. त्यातच त्याच्या अंगावर जिवंत विजेची तार अडकविलेला बांबू पडल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकरणी जलालखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***
दुचाकी चोरट्यांना अटक
पारशिवनी : मोटरसायकल चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना पारशिवनी पोलिसांनी नुकतीच अटक केली. यातील अन्य एक आरोपी पसार असून, त्याचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
राजेंद्र सिंग (२१) व संजय बाबुलाल चव्हाण (२३) दोघेही खदान क्रमांक - ६, कन्हान, ता. पारशिवनी अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची तर, चिंटू ऊर्फ अखिलेश सिंग असे पसार असलेल्या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी गजानन तेजराम बिच्छोरे रा. पटगोवारी यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/एएफ-०६८२ क्रमांकाची मोटरसायकल पारशिवनी तालुक्यातील माहुली नजीकच्या डोलामाईन परिसरात उभी ठेवली होती. दरम्यान, या तिघांनी संगनमत करून ही मोटरसायकल मंगळवारी दुपारी चोरून नेली होती. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दरम्यान, या प्रकरणातील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी चोरट्यांकडून त्यांनी चखेरून नेलेल्या मोटरसायकलसह त्यांनी चोरी करण्यासाठी वापरलेली एमएच-४०/एएच-२३८७ क्रमांकाची मोटरसायकल जप्त केली. त्यांच्याकडून चोरीच्या आणखी काही घटना उघड होण्याची शक्यता पारशिवनी पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर घटनेचा तपास नत्थू मेहर व राकेश नलगुंडवार करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
***