शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

27 वर्षांच्या युवतीने सुरू केला गाईच्या दुधाचा व्यवसाय, 2 वर्षांत 1 कोटी रुपयांचा टर्नओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 10:59 IST

शिल्पी या 2012 मध्ये बेंगळुरू येथे शिक्षणासाठी आल्या होत्या. येथे गाईचे शुद्ध दूध मिळवण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या आणि येथूनच आपणच शुद्ध गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू करावा, असा निर्णय त्यांनी घेतला.

ठळक मुद्देझारखंडच्या शिल्पी बेंगळुरूमध्ये करतायेत गाईच्या दुधाचा व्यवसायकंपनीचा टर्नओव्हर 2 वर्षांत 1 कोटी रुपयेग्राहकांची संख्या 500 वर पोहोचल्यानंतर शिल्पी यांनी सुरू केली कंपनी

नवी दिल्ली - कल्पना शक्ती आणि कुठलेही काम हटके करण्याची क्षमता असेल, तर यश तुमच्या पायाशी लोळण घेते. हे सिद्ध केले आहे झारखंडमधील डाल्टनगंज येथील शिल्पी सिन्हा यांनी. शिल्पी यांनी बेंगळुरूमध्ये गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी केवळ 11 हजार रुपयांपासून सुरू केलेल्या या कंपनीचा टर्नओव्हर पहिल्याच दोन वर्षांत एक कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शिल्पी या 2012 मध्ये बेंगळुरू येथे शिक्षणासाठी आल्या होत्या. येथे गाईचे शुद्ध दूध मिळवण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या आणि येथूनच आपणच शुद्ध गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू करावा, असा निर्णय त्यांनी घेतला. मात्र महिला आणि कंपनीच्या एकमेव फाउंडर म्हणून डेअरी व्यवसायात काम करणे सोपे नव्हते. त्यांना ना कन्नड भाषा येत होती, ना तमिळ. तरीही त्या शेतकऱ्यांकडे जाऊन गाईच्या चाऱ्यापासून ते तिच्या देखभालीपर्यंत सर्व गोष्टी समजून सांगत होती.  

सुरुवातीला दूध पुरवठा करण्यासाठी कर्मचारी मिळत नव्हते. यामुळे त्यांना सकाळी तीन वाजताच शेतात जावे लागत. शेतावर जाताना स्वसंरक्षणासाठी त्या चाकू आणि मिर्ची स्प्रे देखील जवळ ठेवत असत. ग्राहकांची संख्या 500 वर पोहोचल्यानंतर शिल्पी यांनी केवळ 11 हजार रुपयांच्या फंडापासून 6 जनवरी 2018 रोजी 'द मिल्क इंडिया कंपनी' सुरू केली आहे. या कंपनीचा पहिल्या दोन वर्षांतील टर्नओव्हर तब्बल एक कोटींवर पोहोचला आहे.

1 ते 9 वर्षांच्या मुलांवर लक्ष्य -शिल्पी सांगतात, की  आमची कंपनी 62 रुपए प्रति लीटर दराने गाईचे शुद्ध कच्चे दूधच विकते. त्यांच्यामते हे दूध पिल्याने मुलांची हाडे बळकट होतात आणि शरिरातील कॅल्शियमदेखील वाढायला मदत होते. यामुळे आम्ही केवळ 1 ते 9 वर्षांच्या मुलांवरच अधिक फोकस करतो. एवढेच नाही, तर या दूधाची गुनवत्ता वाढवण्यासाठीही कंपनी विशेष प्रयत्न करते.

मुलांचे वय एकावर्षांपेक्षा कमी असेल तर दूध देत नाही - कोणतीही ऑर्डर घेताना मुलाच्या बाळाच्या आईला आधी मुलाच्या वयासंदर्भात विचारणा केली जाते. जर मुलगा एक वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर, त्यांना ही कंपनी दूध देत नाही, असेही शिल्पी सांगतात.

टॅग्स :milkदूधcowगायIndiaभारतBengaluruबेंगळूरwomen and child developmentमहिला आणि बालविकास