व्हॉटस्ॲपकडून २७ लाख भारतीय खाती बंद; वापरकर्त्यांकडून रिपोर्ट करण्यापूर्वीच कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 05:39 IST2022-11-03T05:31:09+5:302022-11-03T05:39:16+5:30
व्हॉटस्ॲपने ऑगस्टमध्ये २३.२८ लाख खाती बंद केली होती.

व्हॉटस्ॲपकडून २७ लाख भारतीय खाती बंद; वापरकर्त्यांकडून रिपोर्ट करण्यापूर्वीच कारवाई
नवी दिल्ली : तत्काळ संदेश पाठवण्याची सुविधा असलेल्या व्हॉटस्ॲपने सप्टेंबर महिन्यात २६.८५ लाख खात्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये ८.७२ लाख खाती वापरकर्त्यांकडून रिपोर्ट करण्यापूर्वीच हटवण्यात आली, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
व्हॉटस्ॲपने ऑगस्टमध्ये २३.२८ लाख खाती बंद केली होती. त्या खात्यांपेक्षा सप्टेंबरमध्ये ब्लॉक केलेल्या खात्यांची संख्या १५ टक्क्यांनी अधिक आहे. १ सप्टेंबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत २,६८५,००० व्हॉटस्ॲप खाती बंद करण्यात आली. वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी यापैकी ८७२,००० खाती प्रतिबंधित करण्यात आली. भारतीय खाते हे ९१ फोननंबरद्वारे ओळखले जाते, असे व्हॉटस्ॲपने सप्टेंबर महिन्याच्या अहवालात म्हटले आहे.