२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला १८ दिवसांची NIA कोठडी, वकील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 08:04 IST2025-04-11T08:03:05+5:302025-04-11T08:04:30+5:30

Tahawwur Rana NIA custody: राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे

26/11 Mumbai attacks mastermind accused Tahawwur Rana sent to 18 days NIA custody | २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला १८ दिवसांची NIA कोठडी, वकील म्हणाले...

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला १८ दिवसांची NIA कोठडी, वकील म्हणाले...

26/11 Mumbai attacks accused Tahawwur Rana sent to 18 days NIA custody: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अखेर १८ दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. तहव्वूर राणाला पटियाला हाऊस NIAच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली आणि राणाला १८ दिवसांची कोठडी बजावण्यात आली. राणाला गुरुवारी भारतात आणले गेले. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली आणि त्याला भारतात आणण्यात आले. आता राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

वकिलांनी काय सांगितले?

दिल्ली राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे तहव्वुर राणाचे वकील म्हणाले, "एनआयएने २० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने चौकशीसाठी १८ दिवसांची कोठडी दिली आहे. न्यायालयाने निर्देश दिले आहेत की त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी आणि पुढील तारखेला हजर होण्यापूर्वी वैद्यकीय चाचण्या केल्या जातील आणि त्या दरम्यानच्या सर्व वैद्यकीय बाबी पूर्ण केल्या जातील. येत्या काळात तहव्वुर राणाला प्रत्यक्षरित्या न्यायालयासमोर हजर केले जाईल."

तत्पूर्वी, तहव्वूर राणाला कडक सुरक्षा व्यवस्थेत एनआयएच्या विशेष न्यायालयात नेण्यात आले. रात्री उशिरा न्यायालयात सुनावणी सुरू करण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एनआयएच्या वतीने वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या प्रकरणाशी संबंधित तथ्ये न्यायालयात सादर केली. न्यायाधीशांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली गेली. यानंतर एनआयएचे वकील दयान कृष्णन यांनी तहव्वूर राणा यांच्याविरुद्धच्या कलमांचा उल्लेख करत, संबंधित उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर सादर केले.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालय परिसरात सीआयएसएफसह निमलष्करी दलांचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. भारतात दाखल झालेल्या तहव्वुर राणाचा एक फोटो समोर आला आहे. राणाचा हा पाठमोरा फोटो असून, यात त्याचे पांढरे झालेले केस आणि अंगावर चॉकलेटी रंगाचे कपडे दिसत आहेत.

Web Title: 26/11 Mumbai attacks mastermind accused Tahawwur Rana sent to 18 days NIA custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.