"कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 13:22 IST2025-04-13T13:21:10+5:302025-04-13T13:22:05+5:30

quran demands by terrorist rana with pen paper nia custody 26 11 mumbai attacks तसेच तो दिवसातून पाच वेळा नमाज पठण करतो, असे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

26-11 mumbai attacks Terrorist Tahawwur Rana demands for Quran pen and paper in NIA custody | "कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी

"कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी

अमेरिकेतून भारतात आणण्यात आलेला, मबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा सध्या १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत आहे. त्याला शुक्रवारी सकाळच्या सुमारास दिल्लीतील एनआयए मुख्यालयात आणण्यात आले आहे. त्या कडोकोट सुरक्षा बंदोबस्तात एक सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याने येते कुराणची एक प्रत, पेन आणि काकद, या तीन गोष्टींची मागणी केली आहे. तसेच तो दिवसातून पाच वेळा नमाज पठण करतो, असे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

राणाला सामान्य कैद्याप्रमाणेच ठेवण्यात आले आहे -
दरम्यान, एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणाला सामान्य कैद्याप्रमाणे ठेवण्यात आले आहे. त्याला कुठलीही विशेष सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. दर ४८ तासांनी त्याची वैद्यकीय तपासणी होत आहे. त्यांना दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरणाने (DLSA) नियुक्त केलेल्या त्याच्या वकिलाला दर दुसऱ्या दिवशी भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याला पेन आणि कागद देण्यात आला आहे. त्याने स्वतःला काही इजा करून घेऊ नये, म्हणून त्याच्यावर कडक लक्ष ठेवण्यात आले आहे. त्याने या तीन गोष्टींव्यतिरिक्त इतर कुठलीही मागणी केलेली नाही, असेही एनआयए अधिकाऱ्यानी म्हटले आहे.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राणाची सातत्याने चौकशी -
एनआयएचा एक चमू २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राणाची सातत्याने चौकशी करत आहे. यात डेविड हेडली आणि त्याच्यात झालेले फोन कॉल्स हा महत्वाचा मुद्दा आहे. हेडलीदेखील मुंबई हल्ल्याच्या कटात होता असा आरोप आहे. तो सध्या अमेरिकेतील कारागृहात आहे. याशिवाय, हल्ल्यापूर्वी राणाने ज्या लोकांसोबत संपर्क साधला होता त्यांच्यासंदर्भातही चौकशी केली जात आहे.

Web Title: 26-11 mumbai attacks Terrorist Tahawwur Rana demands for Quran pen and paper in NIA custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.