शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

भाजपात प्रवेश केल्याने मुस्लिम कुटुंबांना मशिदीत प्रवेश नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 2:59 PM

या कुटुंबांना स्वत:साठी नवी मशीद तयार करावी लागली. 

आगरतळा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या त्रिपुरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्रिपुरात सध्या गाजत असलेल्या एका घटनेवरून याचे प्रत्यंतर येत आहे. भाजपात प्रवेश केल्यामुळे दक्षिण त्रिपुरात 25 मुस्लिम कुटुंबीयांना मशिदीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे या कुटुंबांना स्वत:साठी नवी मशीद तयार करावी लागली. शांतीबाजार विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मोईदतिला गावात हा प्रकार घडला. या गावात राहणाऱ्या 100 कुटुंबीयांपैकी 83 कुटुंब ही मुस्लिम आहेत. यापैकी 25 कुटुंबांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी रीतसर पक्षात प्रवेशही केला. मात्र, त्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी या कुटुंबांना मशिदीत प्रवेश नाकारला. त्यामुळे या गावकऱ्यांनी गावामध्ये स्वत:साठी वेगळी मशीद तयार केली. आम्ही 16 महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून आम्हाला मशिदीमध्ये नमाज पढण्यास मज्जाव करण्यात आल्याचे बाबुल हुसेन यांनी सांगितले. जोपर्यंत हिंदुत्ववादी पक्षाला समर्थन द्याल तोपर्यंत इथं नमाज पढता येणार नाही असे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही लोकांनी गावात वेगळी मशीद बांधल्याचे हुसेन यांनी सांगितले. या मशिदीत इमामाची नियुक्ती करण्यात आली असून 25 कुटुंबांकडून त्यांना पगार दिला जातो. भाजपा केवळ हिंदुत्त्ववादी पक्ष आहे, असे आम्हाला वाटत नाही. देशभरात मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे भाजपा नसून काँग्रेस आणि सीपीएम सारखे पक्ष आहेत. ज्या मुस्लिमांना मारहाण झाली असेल ते नक्कीच काहीतरी चुकीचे वागले असतील. अन्यथा चांगल्या लोकांवर विनाकारण हल्ले का होतील? , असा सवाल बाबुल हुसेन यांनी उपस्थित केला. काँग्रेस संपल्यातच जमा आहे. डाव्यांनी 25 वर्षे सत्ता उपभोगली, परंतु आपल्या पदरात काहीही पडलं नसल्याचे हुसेन यांनी म्हटले. त्यामुळे भाजपाची सत्ता आली तर आमच्या समस्या सुटतील अशी आशा हुसेन यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BJPभाजपाMuslimमुस्लीम