डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस! प्रत्येकाला मिळणार लस; उत्पादन क्षमता वाढवणार - निती आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:06 AM2021-05-14T06:06:06+5:302021-05-14T06:10:02+5:30

डॉ. पॉल यांनी सांगितले की, फायझर, मॉडेर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसी भारतात याव्यात यासाठी परराष्ट्र खाते या कंपन्यांच्या संपर्कात आहे.

216 crore dose till December! Everyone will get the vaccine says NITI Aayog | डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस! प्रत्येकाला मिळणार लस; उत्पादन क्षमता वाढवणार - निती आयोग

डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस! प्रत्येकाला मिळणार लस; उत्पादन क्षमता वाढवणार - निती आयोग

Next

नवी दिल्ली : येत्या ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशात कोरोना लसींच्या २१६ कोटी डोसचे उत्पादन होणार असून त्यांचा उपयोग पूर्णपणे भारतीय नागरिकांसाठीच केला जाईल. आगामी काळात प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.
डॉ. पॉल म्हणाले की, देशातील ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोमानाच्या व्यक्तींपैकी १/३ लोकांना आता कोरोनापासून संरक्षण मिळाले आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसींचे १८ कोटी डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेने नागरिकांना २६ कोटी डोस दिले असून ती याबाबत पहिल्या क्रमांकावर तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


डॉ. पॉल यांनी सांगितले की, फायझर, मॉडेर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसी भारतात याव्यात यासाठी परराष्ट्र खाते या कंपन्यांच्या संपर्कात आहे. डोस पाठविणार की भारतात त्यांचे उत्पादन करणार अशी विचारणा या कंपन्यांना केंद्र सरकारने केली होती. आम्ही लसींच्या उत्पादनाबाबत संबंधितांचे सहकार्य घेणार आहोत. 

    इतर कंपन्याही बनविणार कोव्हॅक्सिन
-  कोव्हॅक्सिन ही लस बनविण्याचा फॉर्म्युला इतर कंपन्यांना देण्याची तयारी भारत बायोटेकने दाखविली आहे. 
-  देशात कोरोना लसींचे आणखी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी भारत बायोटेककडे तशी मागणी अनेक राज्यांनी केली होती. देशात लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसी सध्या वापरण्यात येत आहेत.

रशियाने बनविलेली स्पुतनिक व्ही लस भारतात दाखल झाली आहे. ही लस पुढच्या आठवड्यात बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होईल. 
    - डॉ. व्ही. के. पॉल, सदस्य, नीती आयोग

कोरोनातून बरे झालेल्यांना सहा महिन्यांनी लस, विशिल्डबाबत शिफारस
कोरोना संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीने त्यानंतर सहा महिन्यांनी कोविशिल्डची लस घ्यावी, अशी शिफारस लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने केली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये असलेले पूर्वीचे अंतर बदलण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.

-  कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर असावे. 
-  गरोदर महिलेने कोविशिल्ड व कोवॅक्सिन यापैकी कोणतीही लस घ्यावी. बाळंतपणानंतर केव्हाही कोरोना लस घेऊ शकते. 
-  या शिफारशी आता तज्ज्ञ समितीसमोर मांडल्या जातील. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल.
-  कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर पूर्वी २८ दिवसांचे होते. ते सहा 
ते आठ आठवडे करण्यात आले. 

लसींचे डिसेंबरपर्यंतचे उत्पादन
कोविशिल्ड -    ७५ कोटी
कोव्हॅक्सिन -    ५५ कोटी
बायो ई सब युनिट -    ३० कोटी
झायडस कॅडिला डीएनए -    ०५ कोटी
एसआयआय-नोवाव्हॅक्स -    २० कोटी
बीबी नोझल व्हॅक्सिन -      १० कोटी
जिनोव्हा एमआरएनए     - ६ कोटी
स्पुतनिक -    १५.६० कोटी 
एकूण -    २१६ कोटी
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 216 crore dose till December! Everyone will get the vaccine says NITI Aayog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app