झारखंडच्या सारंडा जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. ३६ तास चाललेल्या या चकमकीत आतापर्यंत २१ नक्षलवादी ठार झाले आहेत. गुरुवारी १५ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर, शुक्रवारी आणखी सहा मृतदेह सापडले. २ कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस असलेला भयानक नक्षलवादी अनल २५ सैनिकांसह येथे वेढला गेला होता. अनलसह २१ जणांना ठार मारण्यात आले आहे.
झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा येथील घनदाट जंगलात पतिराम मांझी उर्फ अनल दा हा दोन डझन नक्षलवाद्यांसह घेरला गेला होता. सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्यांना घेरले. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा दलांनी ताबा घेतला आणि प्रत्युत्तर देऊन दहशत निर्माण केली. २.३५ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला अनल दा देखील ठार झाला. झारखंड सरकारने १ कोटी रुपयांचे, ओडिशा सरकारने १.२ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते आणि राष्ट्रीय तपास संस्थेने त्याच्यावर १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
अनल दा हे माओवादी लष्करी आयोगाचे प्रमुख देखील होते. काही दिवसापूर्वी कोल्हाणच्या सारंडा वनक्षेत्रात माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या मोठ्या हल्ल्यांमध्ये अनल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनमोल उर्फ सुशांत हा एसएसी कमांडर होता, त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. अनमोलवर ओडिशामध्ये ६५ लाख रुपयांचे बक्षीसही होते. आतापर्यंत मारल्या गेलेल्या डझनहून अधिक नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक महिलांचा समावेश आहे.
स्फोटके जप्त केली
अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी ६ वाजता चाईबासा येथील किरीबुरूच्या दुर्गम कुमडी आणि होंजोदिरी गावांमध्ये सुरू झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर केला जात आहे. या कारवाईने माओवादी संघटनेचा कणा मोडला आहे.
Web Summary : In Jharkhand's Saranda forest, security forces killed 21 Naxalites, including top leader Anal Da, who had a bounty of ₹2.35 crore on his head. The joint operation by CRPF and Jharkhand Police resulted in the seizure of weapons and explosives.
Web Summary : झारखंड के सारंडा जंगल में सुरक्षा बलों ने 21 नक्सलियों को मार गिराया, जिनमें 2.35 करोड़ रुपये के इनामी शीर्ष नेता अनल दा भी शामिल था। सीआरपीएफ और झारखंड पुलिस के संयुक्त अभियान में हथियार और विस्फोटक जब्त किए गए।