शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

२०२० मध्ये देशात ५,५७९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात, कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांची संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 09:46 IST

Farmer Suicide:  देशभरात २०२० मध्ये  ५,५७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तथापि, त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत या संख्येत  घट झाली आहे,  अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी संसदेत दिली. मागील वर्षी २०१९ मध्ये ५,९५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

नवी दिल्ली :  देशभरात २०२० मध्ये  ५,५७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तथापि, त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत या संख्येत  घट झाली आहे,  अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी संसदेत दिली. मागील वर्षी २०१९ मध्ये ५,९५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या  आकडेवारीचा हवाला देत कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले की,  शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यामागचे वेगळे कारण एनसीआरबीने अहवालात दिलेले नाही. लोकसभेत लेखी उत्तर देताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसह लोकांनी आत्महत्या करण्यामागच्या कारणांत कौटुंबिक समस्या, आजारपण, अमली पदार्थांचा गैरवापर/व्यसन, विवाहसंबंधी मुद्दे, प्रेम प्रकरणे, कर्जबाजारीपण, परीक्षेत अपयश, बेरोजगारी, व्यावसायिक/ करिअरसंबंधी समस्या किंवा संपत्तीचा वाद यांचा समावेश आहे. देशात, विशेषत: मध्य प्रदेशात खतांअभावी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सरकारला मिळालेली नाही. 

महाराष्ट्रात सर्वाधिक२०२० मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या एकूण घटनांपैकी महाराष्ट्रात  सर्वाधिक २,५६७  घटना घडल्या.  त्यानंतर  कर्नाटक (१,०७२), आंध्र प्रदेश (५६४), तेलंगण (४६६), मध्य प्रदेश (२३५) आणि चंदीगडमध्ये २२७ घटना घडल्या. उत्तर प्रदेशात २०२० मध्ये ८७ शेतकऱ्यांंनी आत्महत्या केली. त्याखालोखाल तामिळनाडू (७९), केरळ (५७), आसाम (१२), हिमाचल प्रदेश (६), तसेच मेघालय आणि मिझोराम (प्रत्येकी चार) आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत