Coronavirus Outbreak! देशात २०१ नवे रुग्ण, पण ऑक्सिजनची तयारी ठेवण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 05:35 IST2022-12-25T05:34:16+5:302022-12-25T05:35:28+5:30
सतर्कता म्हणून केंद्र सरकारने राज्यांना ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक तयारी करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Coronavirus Outbreak! देशात २०१ नवे रुग्ण, पण ऑक्सिजनची तयारी ठेवण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली: देशात २०१ नवे रुग्ण देशात २४ तासांत कोरानाचे २०१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून ३,३९७ झाली आहे. राज्यातील रुग्णांमध्ये अद्याप तरी मोठी वाढ झालेली नाही. मात्र सतर्कता म्हणून केंद्र सरकारने राज्यांना ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक तयारी करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी सांगितले. मांडविया यांनी सांगितले की, या देशातून येणाऱ्या कोणत्याही प्रवाशामध्ये कोरोना संसर्गाचे लक्षण दिसून आल्यास त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल.
भारतात ओमायक्रॉनच्या एक्सबीबी आणि बीएफ.७ प्रकाराचे काही रुग्ण समोर आले आहेत. पण, यात वेगाने वाढ दिसत नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाही. सध्या भारताची स्थिती ठीक आहे. गगनदीप कांग, विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"