२ बायका, ९ मुलं आणि ६ गर्लफ्रेंड्स; गंभीर गुन्ह्यांत सहभागी सोशल मीडिया स्टार अटकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:53 IST2023-11-30T15:52:09+5:302023-11-30T15:53:45+5:30
अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अमित मौर्य याच्याबाबत पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२ बायका, ९ मुलं आणि ६ गर्लफ्रेंड्स; गंभीर गुन्ह्यांत सहभागी सोशल मीडिया स्टार अटकेत!
लखनौ - वेगवेगळ्या ९ गुन्ह्यांत सहभागी असलेल्या सोशल मीडिया स्टारला बुधवारी सरोजनीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अजित मौर्य (वय ४१) असं सदर आरोपीचं नाव असून बायकोसोबत फिरायला जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून प्रसिद्धी मिळवणारा अजित मौर्य हा नकली नोटा छापणे, पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणे, विविध योजनांचा बनाव रचून आर्थिक फसवणूक करणे, अशा एकूण नऊ गुन्ह्यांमध्ये तो सहभागी होता. नुकतंच धर्मेंद्र कुमार या व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला अजित मौर्य आपल्या बायकोसोबत एका पर्यटनस्थळी फिरायला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
२ बायका, ९ मुलं आणि ६ गर्लफ्रेंड्स
अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अमित मौर्य याचे कॉल रेकॉर्ड्स तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमितला दोन बायका असून एकूण नऊ मुले आहेत. तसंच त्याला इतर सहा गर्लफ्रेंड्सही असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. सहावी नापास असलेला अमित मौर्य २०१६ पासून गुन्हेगारी क्षेत्रात आला. आतापर्यंत त्याने गंभीर स्वरुपाचे ९ गुन्हे केले आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत असल्याने अनेक महिलाही त्याच्या जाळ्यात फसल्या.
आलिशान आयुष्य जगत होता आरोपी
फसवणुकीतून आलेल्या पैशातून आरोपी अमित मौर्य हा आलिशान आयुष्य जगत होता. तसंच त्याने आपल्या दोन्ही बायकांसाठी दोन वेगवेगळी घरेही दिली होती. आता अमितच्या अटकेनंतर पोलीस त्याची कसून चौकशी करत असून आणखी नवी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.