शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर : शोपियानमध्ये चकमकीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 08:51 IST

जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान, परिसरात आणखी एक दहशतवादी असून जवानांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या चकमकीदरम्यान एक जवानदेखील जखमी झाला आहे. सोमवार (18 डिसेंबर) संध्याकाळची ही घटना आहे. 

शोपियान जिल्ह्यातील बटमुरान गावातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवान, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी परिसराला घेराव घातला. यावेळी पळ काढण्याच्या हेतूनं दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली, मात्र शोध मोहीमदरम्यान जवानांना दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. 

 

 

 

जम्मू काश्मीर पोलीसचे इन्स्पेक्टर जनरल मुनीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत, मात्र तिसरा दहशतवादी अद्यापपर्यंत जिवंत असून तो परिसरातीलच घरात लपून बसला आहे.  दरम्यान,  यावर्षी शोधमोहीमेदरम्यान सुरक्षा रक्षकांनी आतापर्यंत 200 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 2016 वर्षात सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईमध्ये एकूण 165 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती. तर या वर्षी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 77 जवान शहीद झालेत, तर 2016 मध्ये 88 जवान शहीद झाले होते. 

एकीकडे दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी आणि हल्ले करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतानाच लष्करही पूर्ण सामर्थ्याने त्यांना चोख प्रत्युत्तर देत असते. त्यातच दहशतवादी गटांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानुसार काश्मीरमध्ये वावर असलेल्या बड्या दहशतवाद्यांना पद्धतशीररीत्या टिपण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलिसांची हत्या करणारा लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी बशीर लष्करी तसेच हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सब्जार अहमद भट्ट यांचाही ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे.लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या काश्मीरमध्ये कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांची हिट लिस्ट लष्कराने तयार केली आहे. त्या हिट लिस्टच्या आधारावर लष्कराकडून ऑपरेशन हंट डाऊन अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दहशतवाद्यांसोबतच्या सर्वाधिक चकमकी या दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियाँन आणि अनंतनाग जिल्ह्यात झाल्या आहेत. तर उर्वरित चकमकी या उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा आणि कुपवाडा जिल्ह्यात  आणि मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर