२ बातम्या
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:24+5:302015-02-18T00:13:24+5:30
महाशिवरात्री उत्साहात

२ बातम्या
म ाशिवरात्री उत्साहातऔरंगाबाद : तारकेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त श्रीराम भजनी मंडळातर्फे लघुरुद्राभिषेक, शिवपूजन, भजन, जप, इ. धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. विनायक पांडे, विश्वनाथ इंदोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रुद्राभिषेकाचे पठण प. पू. श्रीनिवास जोशी, डॉ. मुकुं दराव जोशी यांनी केले. त्र्यंबकराव कासोटे, माधवराव गिरी, संदेश वाघ, प्रफुल्लकुमार सुतवणे, बिसनराव बिडवे, गंगाधरराव उदावंत आदींची उपस्थिती होती. नंतर भजनी मंडळातर्फे बहारदार अभंग, गवळणी, भारुडांचा बहारदार कार्यक्रम झाला.कॅन्टीन डे साजराऔरंगाबाद : एस. एस. इंग्लिश स्कूलतर्फे कला व विज्ञान प्रदर्शन तसेच कॅन्टीन डेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत जैन, शाळेच्या संचालिका ज्योती दाभाडे, मुख्याध्यापिका मेघना विजयवर्गीय आदींची उपस्थिती होती. स्टेफी चार्ल्स, पूजा कोलते, शोभा कदम, मीरा धनगारे, मनीषा पालोदकर, तृप्ती जैन आदींनी परिश्रम घेतले.--------