शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारचे आत्मसमर्पण, मंडोली कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 3:45 PM

1984 Anti Sikh Riots : नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल देत सज्जन कुमारला दोषी ठरवले. कुमारला शीखविरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत. याप्रकरणी पुढील शिक्षा भोगण्यासाठी सज्जन कुमारनं सोमवारी (31 डिसेंबर) कोर्टासमोर आत्मसमर्पण केले आहे.

ठळक मुद्दे1984 anti-Sikh riots case: सज्जन कुमार यांचे आत्मसमर्पण मंडोली कारागृहात सज्जन कुमारची रवानगी सज्जन कुमारला कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली - नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल देत सज्जन कुमारला दोषी ठरवले. कुमारला शीखविरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत.  याप्रकरणी शिक्षा भोगण्यासाठी सज्जन कुमारनं सोमवारी (31 डिसेंबर) कड़कड़डूमा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याची मंडोली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान,  शीखविरोधी दंगलप्रकरणी दोषी ठरलेले महेंदर यादव, किशन खोखर यांनी कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. यादव आणि खोखर यांना प्रत्येकी 10-10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

17 डिसेंबर रोजी नवी दिल्ली हायकोर्टानं सज्जन कुमारला 1984 शीखविरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरवले होते. शिवाय, सज्जन कुमारसह सर्व दोषींना 31 डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचेही आदेश दिले होते. 

(1984 शीख विरोधी दंगल प्रकरण: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा)

 

दरम्यान, सज्जन कुमारनं आत्मसमर्पण करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली हायकोर्टात केला होता. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी कोर्टाकडे आत्मसमर्पणाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती. पण कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला आणि 31 डिसेंबर रोजीच आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.  34 वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमारला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याआधी याच प्रकरणात त्यांची मुक्तता झाली होती. 1 नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीच्या राज नगर भागात पाच शिखांची हत्या झाली होती.

 

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सज्जन कुमारची सुटका केली. या निकालाला सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं. दिल्लीच्या कँटॉनमेंटच्या अगदी समोर ही घटना घडली, त्यावेळी प्रशासन नेमकं काय करत होतं, असा प्रश्न सुनावणीवेळी न्यायालयानं विचारला होता.  

टॅग्स :1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगलcongressकाँग्रेसsikhशीख