शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिसॉर्टच्या 19 वर्षीय रिसेप्शनिस्टची हत्या; 4 दिवसांपासून होती बेपत्ता, भाजपा नेत्याच्या मुलाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 17:09 IST

उत्तराखंड राज्यातील पौढी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील पौढी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीची हत्या झाली आहे. 19 वर्षीय अंकिता मागील 18-19 सप्टेंबरपासून बेपत्ता होती. सोशल मीडियावर बेपत्ता तरूणीच्या बाजूने मोठे रान उठले होते. मात्र, अद्याप मुलीचा मृतदेह हाती लागलेला नाही. पोलीस आणि SDRF यांची टीम जिल्हापातळीवर अधिक तपास करत आहे.

पोलिसांनी याप्रकरणी भाजपा नेत्याचा मुलगा पुलकित आर्यसह तीन लोकांना अटक केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे अंकिता जिथे काम करत होती त्या रिसॉर्टचा संचालक हा पुलकित आर्यच होता. अंकिता बेपत्ता झाल्याचे समोर येताच रिसॉर्टचे संचालक आणि मॅनेजर फरार झाले होते. 

पौडी गढवालमधील श्रीकोट गावची रहिवासी असलेली अंकिता भंडारी ही गंगा भोगपुर येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. रिसॉर्टचे संचालक पुलकित आर्यने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, "रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी एका वेगळ्या रूममध्ये राहत होती. काही कालावधीपासून ती मानसिक तणावाचा सामना करत होती. यामुळेच 18 सप्टेंबर रोजी मी तिला ऋषिकेशला फिरायला घेऊन गेलो होतो." तसेच "रात्री उशिरा आम्ही तिथून परतलो. यानंतर रिसॉर्टमध्ये असलेल्या वेगवेगळ्या रूममध्ये आम्ही सगळेजण झोपायला गेलो. मात्र 10 सप्टेंबरच्या सकाळी अंकिता तिच्या रूममधून गायब झाली होती", अशी अधिक माहिती भाजपा नेत्याच्या मुलाने दिली. 

रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांच्या विधानावरून संभ्रम आपली मुलगी बेपत्ता असल्याचे कळताच अंकिताचे वडील गंगा भोगपुरला पोहचले. यादरम्यान तरूणीच्या नातेवाईकांनी रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या माहितीमुळे संभ्रम निर्माण झाला. यानंतर रिसॉर्टचे संचालक आणि संबंधित कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे तक्रार नोंदवण्यात आली. याशिवाय अंकिता भंडारी बेपत्ता झाल्याप्रकरणी स्थानिक आमदार उमेश कुमार यांच्यासह पत्रकार आणि विविध संघटनांनी अंकितासाठी सोशल मीडियावरून आवाज उठवला. अखेर पोलिसांनी आरोपी रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, मॅनेजर, सौरभ भास्कर आणि सहकारी मॅनेजर अंकित गुप्ता या तिघांना अटक केली आहे. 

पोलीस त्यांचे काम करत आहेत - CM धामीउत्तराखंडचेमुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी म्हटले की, ऋषिकेशमधील घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत पोलिसांना सक्त आदेश देण्यात आले आहेत. ज्यांनी कोणी अपराध केला आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली जाईल. पोलीस त्यांचे कार्य करत असून पोलीस पीडितेला न्याय देतील. 

 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडBJPभाजपाDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीChief Ministerमुख्यमंत्री