धक्कादायक! जिममध्ये ट्रेडमिलवर चालताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 12:03 IST2023-09-17T12:02:07+5:302023-09-17T12:03:48+5:30

19 वर्षीय सिद्धार्थ कुमार सिंह असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो सरस्वती विहार खोडा कॉलनी येथील रहिवासी होता. 

19 year old boy suddenly falls while running treadmill in gym ghaziabad dies of heart attack | धक्कादायक! जिममध्ये ट्रेडमिलवर चालताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू

फोटो - आजतक

तरुणांमध्ये हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना एक 19 वर्षीय तरुण अचानक पडला. तिथे उपस्थित असलेले इतर लोक त्याला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना गाझियाबादमधील खोडा पोलीस स्टेशन हद्दीतील सरस्वती विहारमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय सिद्धार्थ कुमार सिंह असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो सरस्वती विहार खोडा कॉलनी येथील रहिवासी होता. 

सीसीटीव्ही फुटेजनुसार, 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ बाबा जिममध्ये ट्रेडमिलवर चालत असताना अचानक खाली पडला. त्याच्या पाठीमागे जीम करत असलेले दोन जण धावत आले आणि त्यांनी सिद्धार्थला उचलले. जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.

सीसीटीव्ही फुटेज पाहून हेही स्पष्ट झालं आहे की ट्रेडमिलचा वेग पूर्वी वेगवान होता आणि तब्येत खराब होताच सिद्धार्थने त्याचा वेग कमी केला. सिद्धार्थ ट्रेडमिलवर पडताच मशीनही बंद झाली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 19 year old boy suddenly falls while running treadmill in gym ghaziabad dies of heart attack