१७० दिवसांचा तुरुंगवास संपला! सोनम वांगचुक यांची सुटका; लडाखच्या प्रश्नावर मांडली मवाळ भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 15:36 IST2026-03-22T15:35:39+5:302026-03-22T15:36:13+5:30

लडाखचे प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक अखेर १७० दिवसांच्या तुरुंगवासानंतर बाहेर आले आहेत.

170 days of imprisonment are over! Sonam Wangchuk released; soft stance on Ladakh issue | १७० दिवसांचा तुरुंगवास संपला! सोनम वांगचुक यांची सुटका; लडाखच्या प्रश्नावर मांडली मवाळ भूमिका

१७० दिवसांचा तुरुंगवास संपला! सोनम वांगचुक यांची सुटका; लडाखच्या प्रश्नावर मांडली मवाळ भूमिका

लडाखचे प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते आणि 'थ्री इडियट्स' फेम खऱ्या आयुष्यातील फुन्सुक वांगडू म्हणजेच सोनम वांगचुक अखेर १७० दिवसांच्या तुरुंगवासानंतर बाहेर आले आहेत. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी लडाखच्या शुद्ध हवेत श्वास घेत आपला आनंद व्यक्त केला. "१७० दिवसांनंतर या डोंगररांगांमध्ये येऊन आणि आपल्या माणसांना भेटून खूप चांगलं वाटतंय. ज्या ध्येयासाठी आम्ही लढतोय, त्यासाठी नक्कीच एक नवी पहाट उजाडेल," असा विश्वास वांगचुक यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सोनम वांगचुक यांना गेल्या सप्टेंबर महिन्यात लेहमध्ये झालेल्या आंदोलनानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. प्रशासनाने हे आंदोलन हिंसक असल्याचे म्हटले होते. मात्र, केंद्र सरकारने आता त्यांच्यावरील अटकेचे आदेश मागे घेतल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. सोमवारी वांगचुक यांनी या संघर्षात साथ देणाऱ्या संपूर्ण देशाचे आभार मानले.

लडाखच्या मागण्यांवर 'लवचिक' पवित्रा

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर वांगचुक यांच्या भूमिकेत एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला. लडाखच्या राजकीय मागण्यांबाबत त्यांनी केंद्र सरकारशी 'देण्या-घेण्याच्या' तत्त्वावर चर्चा करण्यास संमती दर्शवली आहे. त्यांनी म्हटले की, "कोणत्याही चर्चेचा निकाल असा असावा ज्यामध्ये दोन्ही बाजूंचा फायदा होईल. ही 'विन-विन' स्थिती असायला हवी. कोणाचीही हार होता कामा नये."

दोन मुख्य मुद्द्यांवर होणार चर्चा

वांगचुक यांनी स्पष्ट केले की, भविष्यातील चर्चा प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर केंद्रित असेल:
१. लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करणे.
२. लडाखमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करणे (विधानसभा मिळवणे).

वांगचुक म्हणाले, "आम्ही या मागण्यांबाबत लवचिक आहोत. जर दोन्ही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर किमान एकावर तरी ठोस तोडगा निघावा अशी आमची अपेक्षा आहे. जर दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या गरजा लक्षात घेतल्या, तरच ही चर्चा यशस्वी होईल."

संघटनांचा पवित्रा मात्र कायम

एककीकडे सोनम वांगचुक यांनी चर्चेसाठी लवचिक भूमिका घेतली असली, तरी लडाखमधील इतर प्रमुख संघटनांनी मात्र आपल्या मूळ मागण्यांवर कोणताही समझोता करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वांगचुक यांची ही नवीन लवचिक रणनीती केंद्रासोबतच्या चर्चेत किती यशस्वी ठरते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Web Title : 170 दिन बाद सोनम वांगचुक रिहा; लद्दाख पर नरम रुख

Web Summary : विरोध के बाद 170 दिन हिरासत में रहे सोनम वांगचुक रिहा हुए। उन्होंने सरकार के साथ लद्दाख की छठी अनुसूची में शामिल करने और लोकतंत्र की बहाली की मांगों पर बातचीत की वकालत की, जबकि अन्य संगठन दृढ़ हैं।

Web Title : Sonam Wangchuk Released After 170 Days; Softens Ladakh Stance

Web Summary : Sonam Wangchuk, after 170 days in custody following protests, is released. He advocates for dialogue with the government regarding Ladakh's demands for inclusion in the Sixth Schedule and restoration of democracy, signaling a more flexible approach while other organizations remain firm.

टॅग्स :ladakhलडाख