शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टरमाइंड ‘तुफान’सह १६ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:20 IST

अनल ऊर्फ ‘तुफान’वर होते २.३५ कोटी रुपयांचे इनाम!

लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली: झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टरमाइंड व केंद्रीय समिती सदस्य अनल ऊर्फ तुफान ऊर्फ पतिराम मांझी याच्यासह १६ माओवाद्यांना ठार करण्यात गुरुवारी सुरक्षा दलाला यश आले. त्यात पाच महिलांचाही समावेश आहे. १५ मृतदेहांपैकी ११ जणांची ओळख पटली असून उर्वरित चार जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्याच्यावर तब्बल २.३५ कोटीचे इनाम होते. कोब्रा कमांडोंनी सारंडाच्या घनदाट जंगलात त्याला अचूकपणे टिपले, त्यामुळे माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.

अनल ऊर्फ तुफान ऊर्फ पतीराम मांझी हा झारखंडच्या झरहाबाले (जि. गिरीडीह) येथील रहिवासी होता. तो साथीदारांसह सारंडाच्या जंगलात मोठी बैठक घेणार असल्याची ‘टीप’ सुरक्षा दलांना मिळाली होती. आयजी साकेत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोब्रा २०३, २०५ आणि २०९च्या जवानांनी जंगलात  सापळा रचला, यावेळी माओवाद्यांना पळायलाही जागा उरली नाही. घनदाट जंगलात झालेल्या या चकमकीत कोब्रा जवानांनी आपल्या अचूक निशाण्याने नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले. १२ माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले.

दहशत संपली

जवानांवर हल्ले, खून, स्फाेट, शस्त्रे लुटणे अशा स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांत ‘तुफान’चा सहभाग होता. तो केवळ हिंसक कारवायांत सहभागी नव्हता, तर तो पोलिसांना चकमा देण्यातही माहीर होता.हत्या, स्फोट आणि शस्त्रे लुटण्यासारख्या शेकडो गुन्ह्यांत तो वॉन्टेड होता. सारंडा आणि गिरिडीहच्या जंगलात त्याचे एकतर्फी साम्राज्य होते. मात्र, जवानांच्या शौर्यापुढे त्याच्या दहशतीचा अंत झाला आहे.

१५०० जवान सहभागी

किरिबुरू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सारंडा जंगलातील कुमडी भागात झालेल्या कारवाईत सीआरपीएफचे १,५०० जवान सहभागी झाले. कोल्हान-सारंडा या भागात अजूनही नक्षली कारवाया सुरू आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maoist Mastermind 'Tufan' and 16 Others Killed in Jharkhand Encounter

Web Summary : Security forces killed Maoist mastermind 'Tufan' and 15 others in Jharkhand's Saranda forest. 'Tufan', wanted in numerous crimes, carried a ₹2.35 crore bounty. The operation involved 1,500 CRPF personnel, ending his reign of terror in the region.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीJharkhandझारखंड