150 पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे नंबर, ज्योतीसोबत पाकचा दौरा अन्..; हेर जसबीर सिंगची कुंडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:33 IST2025-06-04T13:32:25+5:302025-06-04T13:33:47+5:30

पंजाब पोलिसांनी युट्यूबर ज्योती मल्होत्राप्रमाणेच, युट्यूबर जसबीर सिंगला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे.

150 Pakistani numbers, Pakistan tour..; Jasbir Singh arrested on espionage charges | 150 पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे नंबर, ज्योतीसोबत पाकचा दौरा अन्..; हेर जसबीर सिंगची कुंडली

150 पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे नंबर, ज्योतीसोबत पाकचा दौरा अन्..; हेर जसबीर सिंगची कुंडली

India-Pakistan: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर सुरक्षा यंत्रणांनी देशभरातून अनेक पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक केली आहे. याची सुरुवात युट्यूबर ज्योती मल्होत्रापासून झाली. त्यानंतर हळुहळू अनेक हेरांना ताब्यात घेण्यात आले. आता याच प्रकरणात आणखी एका युट्यूबरला अटक झाली आहे. जसबीर सिंग (४१) असे त्याचे नाव असून, तो पंजाबचा रहिवासी आहे. त्याला इस्लामाबादमधील पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

कोण आहे जसबीर सिंग ?
पाकिस्तानसाठी भारताविरुद्ध हेरगिरी केल्याबद्दल अटक करण्यात आलेला जसबीर सिंग पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्या युट्यूब चॅनलवर (जानमहाल व्हिडिओ) १.१ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर आहेत. त्याने मलेशिया, मालदीव आणि इतर देशांसह जगभरातील त्याच्या प्रवासाचे व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केले आहेत.

पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जसबीरने तीन वेळा पाकिस्तानला प्रवास केला. तो २०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये पाकिस्तानला गेला होता. यापुर्वी अटक केलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राप्रमाणेच जसबीरनेही पाकिस्तानी अधिकारी दानिशच्या निमंत्रणावरून दिल्ली दूतावासात पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या समारंभात भाग घेतला होता.

जसबीर आणि ज्योती मल्होत्रा ​​एकत्र पाकिस्तानला गेले
जसबीर सिंग पाकिस्तानमधील अनेक संघटनांच्या संपर्कात होता. त्याच्या फोनमध्ये १५० पाकिस्तानी नंबर आढळले आहेत, ज्यात पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी सामील आहेत. हा ज्योती मल्होत्राच्या संपर्कात देखील होता. ज्योती आणि जसबीर दोघेही व्हीलॉगर म्हणून एकत्र पाकिस्तानला गेले होते. ज्योती आणि जसबीर दोघांनीही भारताशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत शेअर केल्याचे पुरावे मिळाले आहेत. 

Web Title: 150 Pakistani numbers, Pakistan tour..; Jasbir Singh arrested on espionage charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.