Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:08 IST2025-09-23T10:07:33+5:302025-09-23T10:08:28+5:30
Delhi Kuttu Atta News: दिल्लीतील जहांगीरपुरी आणि आसपासच्या परिसरात कुट्टूच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे १५० ते २०० लोकांना विषबाधा झाली.

Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
दिल्लीतील जहांगीरपुरी आणि आसपासच्या परिसरात कुट्टूच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे १५० ते २०० लोकांना विषबाधा झाली. अचानक उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
#BREAKING Early morning, 150–200 people from Jahangirpuri and nearby areas reported vomiting after consuming Kuttu Atta. BJRM Hospital authorities confirmed all patients were stable, with no serious cases or hospitalizations. Local shopkeepers and residents are being alerted… pic.twitter.com/iyT9lFzKKg
— IANS (@ians_india) September 23, 2025
नेमके काय घडले?
नवरात्रीच्या उपवासासाठी अनेक लोकांनी कुट्टूच्या पिठाचे सेवन केले. त्यानंतर सकाळी त्यांना उलट्या आणि मळमळ सुरू झाली. एकापाठोपाठ अनेक लोकांना हा त्रास होऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यातील बहुतांश रुग्ण जहांगीरपुरी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील आहेत.
रुग्णांची स्थिती
बीजेआरएम रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. कोणत्याही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही किंवा कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. प्राथमिक उपचारानंतर बहुतांश रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.
पोलिसांची कारवाई
या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीने पावले उचलली. पोलिसांनी स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांना सार्वजनिक घोषणांद्वारे सतर्क केले. तसेच, या प्रकरणाची पुढील चौकशी आणि कारवाईसाठी अन्न विभागाला कळवण्यात आले. हे कुट्टूचे पीठ कुठून आले आणि त्यात काय भेसळ होती? याचा तपास आता अन्न विभाग करणार आहे. या घटनेमुळे उपवासाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.