शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

१५ वर्षे जुने ट्रक भंगारात

By admin | Updated: December 4, 2015 03:12 IST

देशातील शहरांमधील हवेचे प्रदूषण असह्यतेच्या पातळीवर पोहोचत आहे व या प्रदूषणात रस्त्यांवरील वाहनांच्या धुराचा भाग मोठा आहे हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने १५ वर्षांहून जुन्या

..अन्यथा प्रदूषणाची स्थिती वाईट होईल

नवी दिल्ली : देशातील शहरांमधील हवेचे प्रदूषण असह्यतेच्या पातळीवर पोहोचत आहे व या प्रदूषणात रस्त्यांवरील वाहनांच्या धुराचा भाग मोठा आहे हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने १५ वर्षांहून जुन्या व्यापारी वाहनांची वाहतूक करण्यास येत्या १ एप्रिलपासून पूर्ण बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहन उद्योगालाही नवी चालना मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव विजय छिब्बर यांनी एका पाश्चात्य वृत्तसंस्थेस ही माहिती देताना सांगितले की, सरकार सर्व प्रकारच्या व्यापारी वाहनांसाठी कमाल आयुर्मान १५ वर्षांचे करणार आहे.या संबंधीचा अधिकृत आदेश येत्या १० दिवसांत जारी केला जाईल व त्यानुसार १५ वर्षांहून अधिक जुन्या व्यापारी वाहनांवर येत्या १ एप्रिलपासून बंदी लागू होईल. काही तरी खंबीर उपाय योजले नाहीत तर भविष्यात प्रदूषणाची स्थिती आणखी वाईट होईल, अशी चिंताही छिब्बर यांनी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)२७ लाख ट्रकवर गंडांतररस्ते वाहतूक मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या वाहन नोंदणीच्या आकडेवारीनुसार सध्या देशात १५ वर्षांहून अधिक जुने असलेले २७ लाख ट्रक रस्त्यांवर धावत आहेत. १ एप्रिलपासून खरंच बंदी लागू झाल्यास या ट्रकवर गंडांतर येईल. दीर्घकाळ मंदी सोसत असलेल्या वाहन उत्पादन उद्योगास यामुळे चांगले दिवस येतील. कारण लाखो नव्या व्यापारी वाहनांची मागणी एकदम तयार होईल.जगभरातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतातील आहेत. दिल्लीतील प्रदूषण सर्वात जास्त आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने गेल्यावर्षी जाहीर केले होते. त्यानंतर दिल्लीतील परिस्थिती आणखी वाईट झाली असून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या ट्रकना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ‘प्रदूषण शुल्क’ लागू केले आहे. राजधानीच्या काही अतिप्रदूषित भागांत दिवसाच्या ठराविक वेळांत वृद्ध व लहान मुलांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्याचा विचारही न्यायाधिकरण करीत आहे. इतर शहरांमधील परिस्थिती दिल्लीएवढी हाताबाहेर गेलेली नसली तरी सुखावह नक्कीच नाही.दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने (सीएसई) केलेल्या अभ्यासानुसार जुनी आणि योग्य देखभाल न केली गेल्याने धुराचे लोट सोडत रस्त्यांवरून वाहणारी वाहने हे विशेषत: शहरांमधील हवेच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण आहे. यातही ट्रकमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण ३० टक्के आहे.वाहतूकदार नाराजपर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी माल वाहतूकदारांनी मात्र नाराजीचा सूर काढला. व्यापारी वाहनांचे कमाल आयुष्य केवळ वयावर ठरविणे अन्यायकारक आहे. तुलनेने कमी वयाची वाहनेही योग्य व वेळच्या वेळी देखभाल न केल्याने जास्त प्रदूषण करतात, हे लक्षात घ्यायला हवे. वाहनांची देखभाल करण्यास प्रोत्साहन मिळेल याचेही उपाय योजायला हवेत. धुरामुळे होणारे प्रदूषण हे केवळ वाहनाच्या वयावर अवलंबून नाही. वाहनांवरील कर आणि पार्किंग शुल्क वाढविणे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करून विस्तारित करणे असे उपाय एकात्मिक पद्धतीने राबविण्याची गरज आहे.-विवेक चट्टोपाध्याय, प्रदूषण तज्ज्ञ, सीएसई