गुंगीचं औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; वेश्याव्यवसायातही ढकलल्याची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 14:37 IST2020-08-30T14:37:35+5:302020-08-30T14:37:58+5:30
पीडित मुलगी मिर्झापूरच्या चुनार तालुक्यातील एका गावातील ती रहिवासी आहे.

गुंगीचं औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; वेश्याव्यवसायातही ढकलल्याची घटना
नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात शनिवारी कोरोनाचे तब्बल 79,000 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे देशातील रुग्णसंख्येने 35 लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र एकीकडे सर्वजण कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
'काही त्रास नाही ना झाला'; MSEBच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर वाराणसीतील ब्युटी पार्लरमध्ये कथितरित्या गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याची माहिती देखील समोर आली आहे. पीडित मुलीनं कशीबशी वेश्याव्यवसायाच्या जागेवरुन सुटका करून घेतली आणि तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित मुलगी मिर्झापूरच्या चुनार तालुक्यातील एका गावातील ती रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीला एका महिला वाराणसीच्या रामनगरमध्ये ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याचे सांगून घेऊन गेली होती. काही दिवस सगळं काही ठीक चाललं होतं. मात्र, त्यानंतर थोड्या दिवसांनी ब्युटी पार्लरमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीला वेश्याव्यवसायात ढकलले. त्यानंतर तिच्यावर दररोज बलात्कार केला जात होता.
मुलीने त्यांच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर वाराणसी पोलिसांत जाऊन घडलेली घटना सांगितली. पीडित मुलीने आरोपींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या-
मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा
आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण