ओडिशामध्ये खासगी बस पुलावरुन कोसळून 15 प्रवाशांचा मृत्यू

By Admin | Updated: September 9, 2016 12:12 IST2016-09-09T12:12:46+5:302016-09-09T12:12:46+5:30

अंगूल जिल्ह्यात खासगी बसचा अपघात झाला आहे. बस पुलावरुन कोसळून झालेल्या या अपघात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत

15 bus deaths in Odisha | ओडिशामध्ये खासगी बस पुलावरुन कोसळून 15 प्रवाशांचा मृत्यू

ओडिशामध्ये खासगी बस पुलावरुन कोसळून 15 प्रवाशांचा मृत्यू

>- ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 9 - अंगूल जिल्ह्यात खासगी बसचा अपघात झाला आहे. बस पुलावरुन कोसळून झालेल्या या अपघात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
अपघातग्रस्त बस बुध जिल्ह्यातून अंगूलच्या दिशेने जात असताना जुन्या मनित्री पुलावरुन खाली कोसळून अपघात झाला. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी अपघातानंतर दुख: व्यक्त केलं असून जखमींना मोफत उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.
 

Web Title: 15 bus deaths in Odisha