145 new corona hotspots districts to be set up in East India? | पूर्व भारतातील नवे १४५ जिल्हे बनणार कोरोनाप्रसाराचे हॉटस्पॉट?

पूर्व भारतातील नवे १४५ जिल्हे बनणार कोरोनाप्रसाराचे हॉटस्पॉट?

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ग्रामीण भागातील १४५ नवीन जिल्ह्यांची यादी तयार केली आहे, जे यापुढच्या काळात योग्य खबरदारी न घेतल्यास कोरोनाच्या प्रसाराचे हॉटस्पॉट ठरू शकतात. हे जिल्हे मुख्यत्वे पूर्व भारतात आहेत. यातील निम्म्याहून अधिक जिल्हे आसाम, छत्तीसगढ, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि मध्य प्रदेशात आहेत. स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यांमध्ये परतू लागल्याने येथील रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.


याबाबत कॅबिनेट सचिव राजीव गौबा म्हणाले की, पूर्वेकडील बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आदी १२ राज्यांत कोरोना रुग्णसंख्या फार कमी होती; परंतु मागील तीन आठवड्यांत ती झपाट्याने वाढत आहे. त्रिपुरा, मणिपूरमधील संख्या एक अंकी होती, ती ही आता वेगाने वाढते आहे. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान आदी मोठ्या राज्यांचा आकडा आधीपासून वेगाने वाढत होता. परंतु झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा आदींचा आकडाही गेल्या काही दिवसांत वेगाने वाढू लागला आहे. गुप्ततेच्या अटीवर एका अधिकाºयाने सांगितले की, या पूर्व भारतातील राज्यांचा आकडा प्रामुख्याने महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आदी मोठ्या राज्यांतून परतणाऱ्यांमुळे वाढत आहे. येणारे गर्दीने येत आहेत.


नियमांचे कठोर पालन करण्याची गरज
च्आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, सध्या या १४५ जिल्ह्यांमधील बाधितांचा एकूण आकडा २ हजार १४७ इतका आहे. ही संख्या देशातील एकूण बाधितांच्या केवळ २.५ टक्के इतकी आहे. या जिल्ह्यांतील प्रशासनाने विलगीकरण, प्रतिबंधित क्षेत्रासाठी तयार केलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी वेळीच केली, तर हा प्रसार नियंत्रणात ठेवणे शक्य होईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 145 new corona hotspots districts to be set up in East India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.