शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

संविधान दिनाच्या कार्यक्रमावर 14 विरोधी पक्षांचा बहिष्कार, भाजपने साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:07 AM

आज संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारने संसद भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण, त्यावर काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, टीएमसीसह 14 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.

नवी दिल्ली: आज संविधान दिन आहे. आजच्या दिनानिमित्त केंद्र सरकारने संसद भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण, या कार्यक्रमात काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक आणि टीएमसीसह 14 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे हिवाळी आधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष आणि सरकारमधील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

केंद्रीय मंत्र्यांची काँग्रेसवर जोरदार टीकाविरोधी पक्षांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल म्हणाले की, आजचा दिवस महत्त्वाचा असून पन्नास वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य करणारा काँग्रेससारखा पक्ष संविधान दिनावर बहिष्कार टाकत आहे. सभापतींनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर  बहिष्कार टाकणे म्हणजे बाबासाहेबांचा अपमान करणे आहे.

हा बहिष्टाकार टाकून काँग्रेसने सिद्ध केले की, ते फक्त त्यांच्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तीचा सन्मान साजरा करतात आणि बाबासाहेब आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांच्या सन्मानाशी त्यांना काहीच देणे-घेणे नाही. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत मात्र या दिवसावर बहिष्कार टाकणे हा संविधानाचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, 'आमच्या देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा. या विशेष दिवशी मी 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच्या संविधान सभेतील भाषणाचा एक उतारा शेअर करत आहे, ज्यात त्यांनी मसुदा समितीने ठरवल्याप्रमाणे संविधानाचा मसुदा स्वीकारण्याचा ठराव मांडला होता. 

 

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनcongressकाँग्रेसBJPभाजपा