शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"काळजावर दगड ठेवून आई वडिलांनी मुलासाठी मागितला मृत्यू"; ३१ वर्षांच्या हरीश राणाची सुन्न करणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:24 IST

सुप्रीम कोर्टाकडून इच्छामृत्यूला मंजुरी मिळाल्यानंतर १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरीशची होणार सुटका!

SC on Harish Rana Case: गेल्या १३ वर्षांपासून कोमात असलेल्या ३१ वर्षीय हरीश राणा याला अखेर इच्छामृत्यूची परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक ऐतिहासिक निकाल देत हरीशला पॅसिव्ह यूथेनेशिया म्हणजेच निष्क्रिय इच्छामृत्यू देण्याची परवानगी दिली आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना मानली जात आहे.

एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं

२०१३ मध्ये हरीश राणा चंदिगढ विद्यापीठात बी.टेक.च्या शेवटच्या वर्षाला होता. सिव्हिल इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहणारा हरीश रक्षाबंधनाच्या दिवशी होस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला. या भीषण अपघातात त्याच्या मेंदूला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो १०० टक्के दिव्यांग झाला. तेव्हापासून तो केवळ मशीन आणि नळ्यांच्या आधारे श्वास घेत होता.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल?

न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा संवेदनशील निकाल दिला. न्यायालयाने एम्स रुग्णालयाला खालील निर्देश दिले आहेत. हरीशचे लाईफ सपोर्ट सिस्टम (व्हेंटिलेटर, फीडिंग ट्यूब) टप्प्याटप्प्याने हटवण्यात यावे. ही प्रक्रिया पूर्ण करताना रुग्णाची 'मानवी प्रतिष्ठा राखली जाईल याची काळजी घ्यावी. हरीशला पॅलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये हलवून नैसर्गिक मृत्यूच्या प्रक्रियेला सहकार्य करावे.

कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक होरपळ

हरीशचे वडील अशोक राणा (६३) आणि आई निर्मला देवी यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. हरीशच्या उपचारावर दरमहा ४० ते ५० हजार रुपये खर्च होत होते. मुलाच्या उपचारासाठी त्यांनी दिल्लीतील आपले तीन मजली घरही विकले होते. वडिलांना केवळ ३,५०० रुपये पेन्शन मिळते, अशा परिस्थितीत हा खर्च पेलणे अशक्य झाले होते. "आता आम्ही मुलाच्या दीर्घायुष्यासाठी नाही, तर त्याच्या मुक्तीसाठी प्रार्थना करत आहोत," अशा शब्दांत आईने आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.

'पॅसिव्ह यूथेनेशिया' म्हणजे काय?

भारतात ऍक्टिव्ह यूथेनेशिया (इंजेक्शन देऊन मारणे) बेकायदेशीर आहे. मात्र, २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने पॅसिव्ह यूथेनेशियाला कायदेशीर मान्यता दिली होती. याचा अर्थ असा की, जर एखादा रुग्ण लाइलाज आजाराने ग्रस्त असेल आणि केवळ उपकरणांच्या आधारे जिवंत असेल, तर त्याचे उपचार थांबवले जातात, जेणेकरून त्याला नैसर्गिक आणि सन्मानपूर्वक मृत्यू मिळावा. संविधानाच्या कलम २१ नुसार, सन्मानाने जगण्यासोबतच सन्मानाने मरण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Parents Seek Death for Son: Harish Rana's Heartbreaking Story

Web Summary : Supreme Court allows passive euthanasia for Harish Rana, 31, in coma for 13 years after accident. Family faced immense financial strain, selling their home for his treatment. Court directs gradual removal of life support with dignity, moving him to palliative care for natural death.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDeathमृत्यू