शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

मन विषण्ण करणारी घटना; पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत, विषप्रयोगाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 10:59 AM

स्थानिक पोलीस आणि वन विभागाकडून तपास सुरू...

केरळमधील गर्भवरी हत्तीण, हिमाचल प्रदेशमधील गर्भवती गाय या प्रसंगानं देशभरात संताप व्यक्त होत असताना माणुसकीचा अंत झाल्याची प्रचिती देणारे प्रसंग रोज समोर येत आहेत. सोमवारी गुवाहाटी येथे स्थानिकांनी बिबट्याची निर्घृण हत्या केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आणि इतरांचा शोध सुरू आहे. आता आणखी एक मन विचलीत करणारी घटना घडली आहे. आसाममधील चचर जिल्ह्यात एका पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत आढळली. त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.

स्थानिक पोलीस आणि वनविभागानं या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. करिमगंज विभागीय वन क्षेत्रातील कलैन येथील कटीरेल जवळ ही घटना घडली. येथील पाण्याच्या टाकीत 13 माकडांचे शव आढळल्यानं एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी लगेच पोलीस व वन विभागाला याबाबत कळवले. वन अधिकाऱ्यांनी माकडांची शव ताब्यात घेतली असून ती शवविच्छेदनासाठी पाठवली आहेत.

करिमगंज विभागीय वन अधिकारी जलनूर अली यांनी सांगितले की,''ही घटना मन सून्न करणारी आहे आणि विभागानं त्याचा तपास सुरू केला आहे. हे येथील स्थानिक माकडं आहेत आणि त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवली आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.'' 

दुसरीकडे काही लोकांनी या माकडांवर विषप्रयोग केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.  

Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!

दरम्यान, गुवाहाटी येथील गोर्चूकमधील काटाहबारी परिसरातील हा प्रसंग आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत काही स्थानिक लोक एका बिबट्याच्या मृत शरिरासह डान्स करताना आणि फोटो काढताना दिसत आहेत. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार या स्थानिकांनी बिबट्याची निर्दयीपणे हत्या केली आणि दात अन् नखही ठेवली नाही. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून दुसऱ्या आरोपींचा तपास सुरू आहे.  याच घटनेला दुजोरा देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोहम्मद जुबैर याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत ही लोकं बिबट्याच्या मृतदेहासह डान्स करताना दिसत आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे.  

टॅग्स :MonkeyमाकडAssamआसाम