लाईक्सच्या नादात मृत्यूचा 'लाईव्ह' थरार; रेड बुल पीत रील बनवणं बेतलं जीवावर, १२ वीच्या विद्यार्थ्याचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:07 IST2026-03-16T13:04:15+5:302026-03-16T13:07:00+5:30

लाईक्सच्या नादात मृत्यूचा 'लाईव्ह' थरार; रील बनवणे बेतले जीवावर!

12th Grade Student Killed While Filming Video on Delhi Mumbai Expressway | लाईक्सच्या नादात मृत्यूचा 'लाईव्ह' थरार; रेड बुल पीत रील बनवणं बेतलं जीवावर, १२ वीच्या विद्यार्थ्याचा अंत

लाईक्सच्या नादात मृत्यूचा 'लाईव्ह' थरार; रेड बुल पीत रील बनवणं बेतलं जीवावर, १२ वीच्या विद्यार्थ्याचा अंत

सोशल मीडियाचे व्यसन आजच्या तरुणाईसाठी जीवघेणे ठरत आहे. व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी नियमांची पायमल्ली करत जीवघेणे स्टंट करणाऱ्या दोन घटनांनी देश हादरला आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि गुजरातच्या राजकोटमध्ये रील बनवण्याच्या नादात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे इतर मित्रही गंभीर जखमी झाले आहेत.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर रील बनवताना काळाचा घाला

पहिली हृदयद्रावक घटना हरयाणाच्या नूंह जिल्ह्यात घडली. बारावीत शिकणारा मोईन आपल्या दोन मित्रांसह दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर रील बनवण्यासाठी गेला होता. मोईन हातात रेडबुलचा कॅन घेऊन स्टाईलमध्ये एक्सप्रेसवेवर चालत होता, तर त्याचा एक मित्र त्याचे शूटिंग करत होता. व्हिडिओ बनवण्यात तिघेही इतके मग्न होते की, मागून येणाऱ्या वेगवान ट्रक त्यांना अंदाजच आला नाही.

वेगवान ट्रकने तिघांनाही जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तरुण हवेत अनेक फूट उडाले. यात मोईनचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुजरातमध्ये हाय-स्पीड कारचा थरार; अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू

दुसरी घटना गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील जेतपूरजवळ घडली. या अपघातात एका आलिशान कारचा भीषण अपघात झाला. अवध तिवारी (२०) नावाचा तरुण गाडी चालवत असतानाच हाय-स्पीड ड्रायव्हिंगचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत होता. गाडीचा वेग ताशी १२० ते १५० किमी दरम्यान होता. रील बनवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारचा भीषण अपघात झाला.

चालक अवध तिवारी याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल होते आणि तो नुकताच तुरुंगातून सुटला होता. या अपघातात अवध आणि देवराज गोसाई (१६) या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला, तर अक्षय वाघेला हा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे.

'रस्ते रीलसाठी नाहीत'; प्रशासनाचे आवाहन

या घटनांनंतर पोलीस आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. "एक्सप्रेसवेवर वाहनांचा वेग प्रचंड असतो. अशा ठिकाणी थांबणे किंवा रील बनवणे हा केवळ गुन्हाच नाही, तर जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. तरुणांनी सोशल मीडियासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये," असं अधिकाऱ्यांनी म्हटलं.

Web Title : रील का जुनून बना जानलेवा: एक्सप्रेसवे पर लाइक्स के लिए जान गंवाई

Web Summary : सोशल मीडिया का जुनून जानलेवा, लाइक्स के लिए युवाओं ने जान जोखिम में डाली। हरियाणा में एक्सप्रेसवे पर रील बनाते समय किशोर की मौत। गुजरात में तेज रफ्तार कार दुर्घटना में दो की मौत। अधिकारियों ने लापरवाही से बचने की चेतावनी दी।

Web Title : Reel Obsession Turns Deadly: Youth Killed Chasing Likes on Expressway

Web Summary : Social media obsession turns deadly as youth risk lives for likes. Two incidents: Haryana, teen killed making reel on expressway. Gujarat, high-speed car crash kills two. Authorities warn against reckless stunts.