शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

सीबीआयमध्ये १२८१ पदे रिक्त; सरकारकडून पुरेसा निधीच उपलब्ध नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 1:36 AM

संसदीय समितीचे निर्देश : योग्य पावले उचला; सरकारने दिला नाही पुरेसा निधी

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भ्रष्टाचारपासून ते गंभीर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाबद्दल (सीबीआय) संसदेच्या समितीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यसभेच्या एका समितीने सीबीआयमध्ये रिक्त असलेली पदे, तांत्रिक सुधारणा आणि अर्थसंकल्पातील तरतूद उपलब्ध करण्यात सरकार आणि सीबीआय दोघांनाही सुधारण्याचा सल्ला दिला.

सीबीआयमध्ये १२८१ पदे रिक्त आहेत. त्यातील सर्वात जास्त ७९८ पदे कार्यकारी अधिकाऱ्यांची आहेत. भूपेन्द्र यादव अध्यक्ष असलेल्या या २८ सदस्यांच्या समितीने रिक्त पदांवरून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. समितीचे म्हणणे असे आहे की, यामुळे तपासात विलंब होईल. तपासाच्या गुणवत्तेवर परिणाम व प्रलंबित प्रकरणांची संख्याही वाढेल. समितीने रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची शिफारस केली आहे.

सीबीआयद्वारे अर्थ मंत्रालयाकडे अंदाजे खर्च म्हणून १,३८६ कोटी रूपये मागितले होते. परंतु, अर्थसंकल्पात फक्त ८०२ कोटी रूपयांची तरतूद केली गेली. समितीला हे मान्य आहे की, गेल्या काही वर्षांत सीबीआयचे काम खूपच वाढले आहे. परंतु, आर्थिक तरतूद कमी असल्यामुळे सीबीआयचे प्रशिक्षण, संशोधन, उपकरण आणि इतर गरजांची पूर्तता होणार नाही. त्यामुळे त्याच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होईल. या परिस्थितीत सीबीआयकडून अपेक्षित परिणामाची आशा करता येणार नाही. त्यामुळे सीबीआयला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.

समितीने सीबीआयचीपायाभूत रचना आणि आधुनिकीकरणावर केल्या जाणाºया खर्चावरूनही प्रश्न विचारले आहेत. अहवालात म्हटले आहे की, या कामासाठीच्या खर्चात सतत घट होत आहे. समितीने त्याच्या नियोजनावर प्रश्न विचारून म्हटले की, अशा विसंगती लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत म्हणजे निधीचा जास्त उपयोग केला जाऊ शकेल.आत्मनिरीक्षणाचा सल्ला२०१६ मध्ये मंजूर केलेली प्रतिष्ठित सेंट्रलाईज टेक्नॉलाजी व्हर्टिकल योजना अजूनही राबवली गेलेली नाही. याशिवाय फोरेन्सिक सायन्समध्ये इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स आणि इंटरनॅशनल सेंटर आॅफ एक्सलन्स इन एक्झामिनेशनलाही बरेच आधी मंजूर केले गेले होते. तीदेखील अजूनप्रलंबित आहे. समितीने यावरून सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्न विचारून आत्मनिरीक्षणाचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Governmentकेंद्र सरकार