शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या कोटासाठी १.२१ कोटींची बोली

By admin | Updated: February 19, 2015 01:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या वादग्रस्त कोटासाठी गुजरातमधील एका कापड व्यापाऱ्याने बुधवारी १.२१ कोटी रुपयांची बोली लावली आहे.

लिलावाचा पहिला दिवस : गुजराती व्यापाऱ्यांमध्ये लागली चढाओढसूरत : ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असा स्वत:च्या पूर्ण नावाच्या उभ्या पट्ट्या कापडातच विणून शिवलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या वादग्रस्त कोटासाठी गुजरातमधील एका कापड व्यापाऱ्याने बुधवारी १.२१ कोटी रुपयांची बोली लावली आहे. मोदी यांनी बंद गळ्याचा हा कोट गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान परिधान केला होता. त्यांचा हा महागडा कोट नंतर राजकीय वादाचे कारण ठरला होता, हे विशेष!येथील कापड व्यापारी राजेश जुनेजा यांनी लावलेली ही बोली दिवसातील सर्वात मोठी बोली ठरली. पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या नऊ महिन्यांच्या कार्यकाळात एकूण ४५५ भेटवस्तू मिळाल्या आहेत. या भेटवस्तूंसह त्यांच्या या वादग्रस्त कोटाच्या लिलावासाठी सुरतच्या एसएमसी सायन्स कन्व्हेन्शन सेंटरतर्फे प्रदर्शन आणि लिलावाचे आयोजन करण्यात आले असून बोलीची ही प्रक्रिया २० फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता बंद होईल, अशी माहिती सुरतचे जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार यांनी दिली. या लिलावातून जमा होणारा निधी पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ गंगा मोहिमेसाठी दिला जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या लिलावात मोदी यांचा गडद निळ्या रंगाचा हा कोट सर्वांसाठीच आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. लिलावात दोन टी शर्टहीमोदींचे दोन टी-शर्टही या लिलावात ठेवण्यात आले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातील आॅस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान क्रिकेट आॅस्ट्रेलियाने त्यांना हे टी-शर्ट भेट दिले होते. (वृत्तसंस्था)च्या कोटासाठी सर्वप्रथम सुरतमधीलच चार्टर्ड अकाऊंटंट पंकज यांनी ११ लाख रुपयांची बोली लावली होती. त्यानंतर काही मिनिटांतच राजू अग्रवाल यांनी ५१ लाखाचा प्रस्ताव मांडला, तर विराळ चौकसी यांनी थेट १ कोटी ११ लाखाला हा कोट खरेदी करण्याची तयारी दर्शविली. दिवसअखेरीस राजेश जुनेजा यांनी १.२१ कोटीची किंमत देऊन सर्वांनाच धक्का दिला. माझे रोल मॉडेलच्‘मोदी माझे रोल मॉडेल आहेत. कठोर मेहनत घेण्याचा त्यांचा स्वभाव आणि त्यांच्यात ठासून भरलेला आत्मविश्वास मला भावला आहे. त्यामुळेच हा सूट एक आठवण म्हणून मला हवा आहे. बोली आणखी वाढली तर मीसुद्धा आपली किंमत वाढविणार आहे. परंतु फारच वेगाने वाढली तर मात्र विचार करावा लागेल, असे या लिलावाचे सर्वात मोठे दावेदार, कापड व्यापारी राजेश जुनेजा म्हणाले.