Video - देवदूत! चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली १२ वर्षांची मुलगी; जवानाने वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:24 IST2026-01-27T19:24:00+5:302026-01-27T19:24:56+5:30

Video - चालती ट्रेन पकडण्याच्या नादात एक १२ वर्षांची मुलगी ट्रेनखाली जाता जाता थोडक्यात वाचली आहे.

12 year old girl saved from going under train constable shows bravery video goes viral | Video - देवदूत! चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली १२ वर्षांची मुलगी; जवानाने वाचवला जीव

Video - देवदूत! चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली १२ वर्षांची मुलगी; जवानाने वाचवला जीव

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या एक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहे. चालती ट्रेन पकडण्याच्या नादात एक १२ वर्षांची मुलगी ट्रेनखाली जाता जाता थोडक्यात वाचली आहे. सवाई माधोपूर येथील गंगापूर सिटी स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या जागेत अडकलेल्या या मुलीला कॉन्स्टेबल रामकेश मीना यांनी मोठ्या धाडसाने बाहेर ओढलं, ज्यामुळे ती रेल्वेखाली जाण्यापासून बचावली.

व्हिडिओमधील हे दृश्य पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर युजर्सनी यावर केवळ प्रतिक्रियाच दिल्या नाहीत, तर रेल्वे प्रवासादरम्यान खबरदारी घेण्याचा सल्लाही दिला आहे. अनेकांनी या घटनेला एक 'अलर्ट' म्हणून पाहिलं असून, सर्वांना वेळेवर घरातून निघण्याचं आणि ट्रेन पकडण्यासाठी असा जीवघेणा धोका न पत्करण्याचं आवाहन केलं आहे.

कसा वाचला मुलीचा जीव? 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, कॉन्स्टेबल रामकेश मीना यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने मुलीच्या दिशेने धाव घेतली आणि योग्य वेळी तिला ओढून रेल्वेखाली जाण्यापासून रोखलं. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तत्पर निर्णयामुळे एक मोठी दुर्घटना टळली. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

वेळेचे महत्त्व आणि सतर्कता

सोशल मीडियावर हा जोरदार व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी जवानाची खूप स्तुती केली आणि काही महत्त्वाचे सल्लेही दिले. एका युजरने लिहिले, "त्या मुलीने यातून धडा घ्यायला हवा की, कोणत्याही कामासाठी, परीक्षेसाठी किंवा ट्रेन पकडण्यासाठी नेहमी वेळेआधीच घरातून निघावं. ऐनवेळी धावपळ करून उपयोग नसतो." दुसऱ्या एका युजरने "ट्रेनमध्ये चढताना कोणताही धोका पत्करू नका, तुमचा जीव सर्वात मौल्यवान आहे" असं म्हटलं आहे. 

Web Title : बहादुर कांस्टेबल ने चलती ट्रेन और प्लेटफॉर्म के बीच फंसी लड़की को बचाया!

Web Summary : गंगापुर सिटी स्टेशन पर एक 12 वर्षीय लड़की चलती ट्रेन और प्लेटफॉर्म के बीच फंस गई थी, जिसे एक कांस्टेबल ने बचाया। कांस्टेबल रामकेश मीना की त्वरित कार्रवाई से एक बड़ी दुर्घटना टल गई, जिसकी सोशल मीडिया पर व्यापक प्रशंसा हो रही है। उपयोगकर्ताओं से ट्रेन यात्रा के दौरान सुरक्षा को प्राथमिकता देने का आग्रह किया गया है।

Web Title : Brave Constable Saves Girl Trapped Between Train and Platform!

Web Summary : A 12-year-old girl was saved by a constable at Gangapur City station after getting trapped between a moving train and the platform. Constable Ramkesh Meena's quick action averted a major accident, drawing widespread praise on social media. Users are urged to prioritize safety during train travel.