कुत्र्याला वाचवताना गेला तोल, 9व्या मजल्यावरुन पडून 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 22:18 IST2021-08-25T22:14:50+5:302021-08-25T22:18:28+5:30

कुत्र्याचं पिलू इमारतीच्या बालकनीतील सेफ्टी जाळ्यात अडकलं होतं, त्याला वाचवताना मुलीचा तोल गेला.

A 12-year-old girl died after falling from the 9th floor while rescuing a dog | कुत्र्याला वाचवताना गेला तोल, 9व्या मजल्यावरुन पडून 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

कुत्र्याला वाचवताना गेला तोल, 9व्या मजल्यावरुन पडून 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली:उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 9 व्या मजल्यावरुन पडून 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. घटना गाझियाबादमधील कवीनगर पोलीस स्टेशन परिसरातील गौर होम्स सोसायटीतील आहे. इमारतीच्या बालकनीत असलेल्या सेफ्ठी जाळ्यात अडकलेल्या कुत्र्याच्या पिलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना मुलीचा तोल गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 12 वर्षीय ज्योत्सना घरात पिल्लाबरोबर खेळत होती. दरम्यान, पिल्लू अचानक बाल्कनीत सेफ्टी सापळ्यात अडकलं. यावेळी ज्योत्सना कुत्र्याला जाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती, या दरम्यान तिचा तोल गेला आणि ती 9 व्या मजल्यावरून खाली पडली.

खाली पडण्याचा आवाज ऐकून ज्योत्सनाची आई किरण यांना घटनेची माहिती मिळाली. त्या तातडीनं खाली उतरल्या आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात नेलं अशता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. जोत्सना आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या जाण्यानं त्या दोघांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 

Web Title: A 12-year-old girl died after falling from the 9th floor while rescuing a dog