बापरे! १२ मोबाईल, परदेशी नाणी, केटीएम बाईक, दागिने; भिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीसही थक्क झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:46 IST2025-02-05T12:46:31+5:302025-02-05T12:46:55+5:30
पोलिसांनी एका भिकाऱ्याची केटीएम बाईक, चांदीचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तू जप्त केल्या आहेत.

बापरे! १२ मोबाईल, परदेशी नाणी, केटीएम बाईक, दागिने; भिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीसही थक्क झाले
बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका महिला भिकारीच्या घरी छापा टाकला, या छाप्यात सापडलेल्या वस्तू पाहून अनेकांना धक्काच बसला. यामध्ये विदेशी नाणी, केटीएम बाईक, १२ मोबाईल, सोनं, चांदी अशा वस्तू आहेत. या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चौकशीमध्ये या महिलेची ओळख नीलम देवी अशी झाली, ती महिला मडवन भोज येथील रहिवासी आहे. ती बाहेरून आली होती आणि मडवन भोज येथील कालव्याच्या काठावर बांधलेल्या घरात राहत होती.
संपूर्ण देशात 'नॉनवेज'वर बंदी आणली पाहिजे; खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मागणी
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही महिला परिसरात फिरून भीक मागायची. पोलिसांनी भिकारी महिलेला अटक केली आहे.
पोलीस ठाण्यात नीलम देवी आणि तिचा जावई चुटुक लाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलम देवी हिने घराच चोरीची बाईक आणि अन्य सामान ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एक संशयीत व्यक्ती केटीएम बाईक घेऊन फिरत असल्याचीही माहिती मिळाली होती. पोलिसांनी लगेच नीलम देवीच्या घरी छापा टाकला. घरातून एक केटीएम बाईक, चांदीचे अँकलेट, नेपाळी, अफगाणी आणि कुवेती चांदीचे नाणी, ईस्ट इंडिया कंपनीचा लोगो असलेले नाणे, चांदी आणि सोन्याचे दागिने आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे १२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही महिला बऱ्याच काळापासून परिसरात भीक मागत असल्याची माहिती मिळाली होती.
भीक मागण्यासह चोऱ्याही करायची
ती महिला लोकांना फसवून चोरीही करायची. तिच्या घरात मौल्यवान वस्तू चोरीच्या असल्याची माहिती मिळाली. यानंतर महिलेच्या घरी छापा टाकण्यात आला. पोलिसांनी महिलेला अटक केली आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. महिलेने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. सर्व सामान जप्त करण्यात आले आणि त्या महिलेला अटक करण्यात आली.
पोलिसांनी महिलेच्या जावयालाही अटक केली. मडवान गावातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे १२ मोबाईल फोन, एक चांदीचे नाणे, नेपाळी अफगाणी, कुवेती नाणे आणि अर्धा किलो चांदीसारखे दिसणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांची कारवाई
व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. भीक मागण्याव्यतिरिक्त, ती महिला गावात फिरून मच्छरदाणी विकायची काम करत होती. भिकारी बनून ती महिला गावातील ठिकाण शोधून त्याची माहिती जावयाला देत होती. यानंतर जावई चोरी करत होता. एक नवीन केटीएम बाईक सापडली आहे. महिलेचा जावई फरार आहे, तिच्या अटकेतून टोळीतील इतरांची माहिती मिळेल. चौकशीदरम्यान महिलेने सांगितले की, या सर्व वस्तू तिच्या जावयाच्या आहेत. ही परदेशी नाणी कुठून आली आणि ती तिथे का ठेवली. चोरीच्या वस्तू कुठून आल्या याचा तपास सुरू आहे.