पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे १२ डबे घसरून ५ जणांचा मृत्यू; ४५ जण झाले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 07:58 IST2022-01-14T07:57:51+5:302022-01-14T07:58:08+5:30

बिकानेर एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांत अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.

12 killed in West Bengal train derailment 45 injured | पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे १२ डबे घसरून ५ जणांचा मृत्यू; ४५ जण झाले जखमी

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे १२ डबे घसरून ५ जणांचा मृत्यू; ४५ जण झाले जखमी

जलपायगुडी : पश्चिम बंगालमध्ये जलपायगुडी जिल्ह्यात दोहोमोनी येथे गुरुवारी बिकानेर एक्स्प्रेसचे बारा डबे रुळावरून घसरले. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. मृत तसेच जखमी व्यक्तींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बिकानेर एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांत अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते, पण अंधारामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या. ही रेल्वेगाडी बिकानेरहून गुवाहाटीला चालली होती. पोलिसांनी सांगितले की, रुळावरून घसरलेल्या बारा डब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले होते. त्यातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. 

Web Title: 12 killed in West Bengal train derailment 45 injured