उत्तरकाशी-यमुनोत्री हायवेवर बस दरीत कोसळून 12 ठार, 13 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 19:23 IST2018-11-18T19:22:23+5:302018-11-18T19:23:08+5:30
जखमींना दरीतून वर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.

उत्तरकाशी-यमुनोत्री हायवेवर बस दरीत कोसळून 12 ठार, 13 जखमी
डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी-यमुनोत्री हायवेवर एक खोल दरीत कोसळल्याने 25 प्रवाशांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत.
यात्रेकरूंना घेऊन जाणारी ही बस उत्तरकाशीहून विकासनगरला जात होती. पुरोलामधील डामटा भागात हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 25 जण प्रवास करत होते. पोलिसांनी अद्याप 9 मृतदेह बाहेर काढले असून दोन गंभीर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करत असताना वाटेत मृत्यू झाला. इतर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
#UPDATE 12 dead, of which 9 bodies have been recovered. Rescue operation underway: Ajay Rautela, DIG Garhwal Range on the bus accident near Damta on Uttarkashi-Yamunotri Highway, earlier today. #Uttarakhandhttps://t.co/tom3iqDF3K
— ANI (@ANI) November 18, 2018
जखमींना दरीतून वर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.