117 gelatin sticks 350 detonators have been seized from passenger train at kozhikode railway station in kerala | केरळमध्ये पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोटकं सापडली, एका महिलेला अटक!

केरळमध्ये पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोटकं सापडली, एका महिलेला अटक!

ठळक मुद्देकोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू एक्सप्रेसमध्ये 117 जिलेटिन स्टिक आणि 350 डिटोनेटर सापडले आहे.

कोझिकोड : केरळमधील कोझिकोड रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू एक्सप्रेसमध्ये 117 जिलेटिन स्टिक आणि 350 डिटोनेटर सापडले आहे. याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. (117 gelatin sticks 350 detonators have been seized from passenger train at kozhikode railway station in kerala)

मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू एक्सप्रेस (02685) मध्ये ही स्फोटके सापडली. एक्सप्रेसमध्ये स्फोटके सापडल्यानंतर संशयित प्रवासी महिलेला अटक करण्यात आली असून, ही महिला तामिळनाडूची असल्याचे समजते. एक्सप्रेसमध्ये  महिलेच्या सीटखालून स्फोटके जप्त करण्यात आली. यावेळी विहीर खोदण्याच्या उद्देशाने तिने जिलेटिनच्या कांड्या आणल्या असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पोलीस या महिलेची कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान, काल मुंबईत रिलायन्स ग्रुपचे प्रमुख, प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अल्टामाऊंट रोडवरील अँटिलिया निवासस्थानाजवळ २० ते २५ जिलेटीनच्या कांड्या ( स्फोटके) असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ हा परिसर सील करून तपासाची चक्रे गतिमान केली. या गाडीमध्ये धमकीची चिठ्ठी आढळून आली आहे. 

याचबरोबर, पोलिसांकडून अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच,याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी 8 ते 10 पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पाहणी सुरु आहे. याशिवाय, मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेली संशयित कार; गाडीत धमकीचे पत्रही सापडले

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 117 gelatin sticks 350 detonators have been seized from passenger train at kozhikode railway station in kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.