जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:30 IST2025-08-31T14:29:18+5:302025-08-31T14:30:13+5:30

jammu kashmir cloudburst: जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात मुसळधार पावसाचा प्रकोप सुरूच असून, जम्मू-काश्मीरच्या रामबन व रियासी जिल्ह्यांत ढगफुटी भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू झाला.

11 killed in cloudburst, landslide in Jammu and Kashmir; 32 devotees missing | जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात मुसळधार पावसाचा प्रकोप सुरूच असून, जम्मू-काश्मीरच्या रामबन व रियासी जिल्ह्यांत ढगफुटी भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू झाला. जम्मू भागात अजूनही ३२ भाविक बेपत्ता आहेत. उत्तराखंडमध्येही बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाने झालेल्या दुर्घटनांत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा बचाव पथके शोध घेत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये रामबन जिल्ह्यांतील गावांत ढगफुटी व भूस्खलनाच्या दोन दुर्घटनांत एकाच कुटुंबातील सात जणांसह ११ जणांचा मृत्यू झाला. या केंद्रशासित प्रदेशात १४ जूनपासून आतापर्यंत १३० जणांचा मृत्यू झाला असून, १४० जखमी आहेत. 

उत्तराखंडमध्येही आपत्ती
उत्तराखंडमधील जिल्ह्यांत ढगफुटी व मुसळधार पावसामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांचा शोध सुरू आहे. चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, टिहरी जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशभरात...
- कर्नाटकमध्ये सीमेवरील जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत, उत्तर कन्नडमध्ये शाळांना सुट्टी.
- पंजाबमध्ये फिरोजपूरमध्ये आतापर्यंत ३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. सतलज नदीला पूर, १०० गावांना फटका.
- बंगालमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा. जलपाईगुडी व अलीपूरद्वार जिल्ह्यांत बचाव पथके सज्ज.  पंजाबमधील पावसामुळे अनेक रेल्वे रद्द.

Web Title: 11 killed in cloudburst, landslide in Jammu and Kashmir; 32 devotees missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.